Wednesday, July 2, 2025
Homeयशकथानवदुर्गा..१

नवदुर्गा..१

प्रिय…… निशु ताई..

नमस्कार मंडळी.
आज पासून सुरू झालेल्या नवरात्री उत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नवरात्री निमित्ताने ओळख करून घेत जाऊ या नवं दुर्गांची…

प्रिय निशूताई,

तुझी हसरी गोड छवी
ज्ञानाने तुझी ओंजळ भरली
प्रेम, करुणा तूझ्या ठायी
दीन दुबळ्यावर तू माया केली
हात दिलास मदत दिली
फुलू लागली बाग कशी
या फुलांना लाभली
निशु ताई तुझी साथ सुगंधी
निशु ताई तुझी साथ सुगंधी

निशु ताई तु म्हणजे एक सुगंधी झरा. सौंदर्य, बुध्दी आणि सामाजिक जाण याचा सुरेख मिलाफ.
सालस, सोज्वळ, देखणं रुप आणि करुणामय, प्रेमळ, गोड स्वभाव, म्हणून तर तुझ्या सोबत इतकी माणसं जुळलेली आहेत.
कधीही फोन केला तरी काळजीने विचारपूस करतेस. घरी आले की किती प्रेमाने जवळ घेतेस. तुझी ही प्रेमळ, शालीनता मनाला भावते. लेखन, साहित्य, अभिनय, समाजकार्य किती किती सुरेख रंग, गंध, पैलू आहेत तुझ्या या हरहुन्नरी, प्रतिभावंत, लोभस व्यक्तिमत्वाला !

तुझी अभिनय क्षेत्रातील दैदिप्यमान कारकीर्द, तू साकारलेल्या अनेक सुरेख भूमिकांनी आमचं मन मोहून घेतलं आणि कायमस्वरूपी आम्हाला तुझ्या प्रेम बंधनात बांधुन ठेवलं.
निशु ताई तुझे सौंदर्य जसं मन मोहून घेणारं आहे तसंच तुझे मन देखील तेवढंच सुंदर आहे. सामाजिक जाणीव जपणारी तू समाजातील प्रश्नांचा संवेदनशीलतेने विचार करतेस. तुझ्या या करूणामयी मनात एक विचार आला आणि झाली सुरुवात डॉ निशिगंधा वाड एज्युकेशन अँड कल्चरल ट्रस्ट या सामाजिक ट्रस्टची. निशुताई तुझ्या कडून हे कार्य होणारच होतं. कारण तुझी आई सन्माननीय डॉ विजया ताई वाड आणि वडील श्री विजय कुमार यांचे संस्कार आणि आशीर्वाद होते ना तुझ्या सोबत. आपल्या ओंजळीतून ओघळणारं हे इतरांच्या पदरात घालून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही जाणीव तुम्ही जपत आहात.

महाराष्ट्र विश्वकोश मंडळाच्या प्रमुख डॉ. विजया वाड या प्रख्यात लेखिका, बाल साहित्यकार तुझी आई. निशु ताई तू वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवलीस आणि ती पुढे नऊ वर्षे तुला मिळत राहिली. ताई सरस्वती तुझ्यावर प्रसन्न आहेच म्हणून तर तू दहावीच्या परीक्षेत पहिल्या पन्‍नासात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसरी आली होतीस.

“भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका” या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी तू १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. २००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं तुला पीएच.डी. बहाल केली. त्याची संपूर्ण नाट्य-चित्रसृष्टीत उत्तम दखल घेतली गेली. सन २००४ मध्ये तीन चित्रपटांच्या महोत्सवासाठी तुला खास दिल्लीहून बोलावणे आले होते. त्यावेळी अभिनेते सुनील दत्त यांच्या हस्ते ’निशिगंधा गौरव विशेषांका’चे प्रकाशन झाले होते.

पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कार प्राप्त झाला. (२२-१-२०१५) अनेक  पुरस्कार तुला मिळाले आहेत. पण हा त्या पुरस्कारांचाच सन्मान आहे खरे.
निशुताई मला तू पहिल्यांदा भेटलीस तेंव्हा माझ्या कामाचं किती कौतुक केलंस! माझ्या पुस्तकांसाठी मला भरभरून आशीर्वाद दिलास. माझा हात धरून मला माझ्या प्रत्येक सामाजिक कार्यात साथ देत आलीस. माझं भाग्य मोठं आहे, ताई की तुझी साथ मला मिळाली आहे.

तुझ्या ट्रस्ट ने सामाजिक कार्यात अग्रेसर होऊन गरजू बालक, बालिका, महिला यांच्यासाठी कायम मदतीचा हात पुढे केला आहे. विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास व नृत्य शिबिर, महिलांसाठी ब्युटीपार्लर कोर्स, किशोरवयीन मुलींसाठी किशोरी आरोग्य कोश, डॉक्टर्स कॅम्प, टेकरिंग प्रशिक्षण, संस्कार वर्ग,
चला वाचूया उपक्रम,
किशोरी आरोग्यकोशचे मोफत वाटल,
उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सत्कार असे
अनेक स्त्युत्त उपक्रम ट्रस्ट ने हाती घेऊन ते यशस्वी रित्या पार पाडले आहेत.

लॉकडाऊन मध्ये २०२० मधील विविध उपक्रम
ट्रस्टने राबवले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा
श्रीम.पूनम राणे मनीषा कदम
विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा : श्रीम. मनीषा कदम, श्रीम. पूनम राणे
चिपळूण महापुरात आधार गमावलेल्या व्यक्तींना मायेचा हात :
मार्गदर्शक : कलेक्टर प्रवीण यांच्या करोना काळात आई- वडील गमावलेल्या राज्यस्तरीय विद्यार्थ्यांना मायेचा हात.
साहित्य जननी शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यस्तरीय ५१ साहित्यिकांच्या सहभागातून साहित्यातील गोंदण पुस्तकाचे प्रकाशन असे कितीतरी उपक्रम तू राबवत आहेस.

निशुताई , कोरोना मध्ये आई वडिलांचा आधार गमावलेल्या बालकाविषयी मी तुला बोलले आणि त्यांची मदत करायला तू लगेच तयार झालीस. माझ्या एका शब्दावर तू तब्बल पन्नास बालकांना मदतीचा हात दिलास. किती प्रेमाने त्या मुलांशी बोललीस. विजयाताई त्यावेळी हॉस्पिटल मध्ये होत्या. तर तू ऑनलाईन येऊन सगळ्या मुलांची मायेने विचारपूस केली. तुझे हे ममतामयी रूप माझ्या मनात कायमचं घर करून आहे.

निशुताई – बालकांसाठी सदैव तत्पर

निशुताई तुला सेंट्रल जूरी कमिटीच्या मेंबर असण्याचा सन्मान मिळाला याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे.

निशूताई – सेंट्रल ज्युरी मेंबर झाली तेव्हा….

माझ्या ट्रस्ट गोल्डन लेटर्स बालविकास संस्था या ट्रस्टची तू सल्लागार आहेस. आपण भविष्यात खूप उपयुक्त उपक्रम निश्चितच राबवणार आहोत. अत्यंत संवेदनशीलतेने तू बालकांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना समजून घेतेस आणि तसे उपाय सुचवून आपण त्या कामाला लागतो. आपण मिळून रेड लाईट एरियातील बालकांसाठी स्मॉल स्कील वर्कशॉप चा प्रकल्प लवकरच हाती घेणार आहोत. तुझ्या मार्गदर्शनात हा प्रकल्प निश्चितच यशस्वी होईल.

निशुताई तुझे सामाजिक कार्य गेली अनेक वर्ष सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अनेक गरजू बालकांना, महिलांना याचा लाभ घेता आला आहे. तुझे हे कार्य अविरत सुरू राहू दे. आम्ही कायम तुझ्या सोबत आहोतच. परमेश्वर कृपेने तुला उत्तम आरोग्य आणि अरूण ऊर्जा लाभू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
तुझीच..
डॉ राणी दुष्यंत खेडीकर.

डॉ राणी खेडीकर

– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४