नवरंग महिमान
परिधानी अभिमान
गोऱ्या रंगा दिसतोय
कांती होते रममाण
हिरवळी रंगावर
निसर्गाशी मैत्री फार
पिवळ्याची नवलाई
उष:काली पितधार
सांजवेळी केशराची
रविराज करी स्वारी
निळ्याशार सागरात
डुंबताना बात न्यारी
काळ्याभोर नभांतरी
टिमटिम ती चांदणी
शुभ्र रुपात न्याहाळी
चमकते हो अंगणी
लाल जांभळी सुमन
नाच नाचे वेलीवर
गाली गुलाबी यौवनी
शोभे रंग ओठांवर
नवरंग पुस्तकात
शब्दशिल्प रमनीय
आल्या जमल्या चंद्रिका
देवी रुप वंदनीय

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800