महाबळेश्वर ची ग्रामदेवता श्री म्हमादेवीच्या सानिध्यात स्त्री शक्तीला व्यासपीठ मिळण्यासाठी यंदाच्या नवरात्री उत्सवात महाबळेश्वर प्रेमी ग्रुप मार्फत प्रथमच जागर स्त्री शक्तीचा अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण रांगोळी स्पर्धा, समूह स्तोत्र पठण स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, महभोंडला, ट्रेजर हंट, प्रश्नमंजुषा स्पर्धा, योगा व झुंबा शिबीर, खेळ नयन पैठणीचा व कराओके नाईट्स यांचा समावेश आहे.
यंदा च्या नवरात्रीत महाबळेश्वर शहर व परिसरातील महिला वर्गातील कलागुणांना वाव मिळावा व नऊ दिवस भक्ती, शक्ती, आनंद व उत्साह यांच्यासमवेत जल्लोषपूर्ण वातावरणात सण साजरा व्हावा या अनुषंगाने सदरच्या उपक्रमाला हिलदारी चे सहकार्य लाभले आहे.

सदर उपक्रमातील आयोजित विविध स्पर्धेमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रासह सहभागीना देखील सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
गेल्या अडीच ते तीन वर्षापासून हिलदारी अभियाना अंतर्गत सर्वांच्या सहकार्याने विविध जनजागृतीचे उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम व नाविन्यपूर्ण संकल्पना शहरात राबविण्यात येत आहे आणि या सर्व उपक्रमांना शहरातील सर्व भागधारकांकडून उदंड प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. या सर्वांच्या प्रयत्नातून आपल्या महाबळेश्वर शहराला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आणण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये नवरात्री मधील या सर्व उपक्रमांचा सुद्धा लाभ होईल यात शंकांच नाही.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अथवा नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी महाबळेश्वर प्रेमी ग्रुपशी संपर्क साधावा व सदर स्पर्धेत जास्तीत जास्त महिला वर्गाने सहभाग घ्यावा असे आवाहन हिलदारी मार्फत करण्यात आले आहे.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800