Friday, December 26, 2025
Homeसाहित्यनवशारदियीनी

नवशारदियीनी

वाट बगतव अंबेची,
दृष्टांत दितस सपनात,
घाय लागता सेवेची ॥

फुलझाडा नटली रानावनात,
शेता पोसावली धनधान्यांन,
कमळा उमालली तलावात ॥

पाच फळा देवीच्या चरणात,
कमळफूल सरस्वतीचा आसान,
त्रिशूळ दुर्गेच्या हातात ॥

नवरूपात दर्शन दितस,
हंसावर आरुड होवन,
वरदान पदरात टाकतस ॥

नवरात्रीतली नवशारदीयीनी,
कुंकवाचे स्वस्तिक दारोदारी,
उंबरठो सजता रांगोळयानी ॥

मकार सजला येलीफुलांनी,
केसात येनी चमेलीची,
काया सजली वस्त्रदागिन्यांनी ॥

समईत वात तुपाची,
तेज चढला मुखार,
व्हटी भरतव खनानारळाची ॥

ओवाळतव देवीक धूपकापरान,
टाळ वाजतत मूरदांगाच्या तालात,
मंत्रमुग्ध अंबेच्या जोगव्यान ॥

चैत्यन्य पसारता दुनयेत,
चोहोबाजूक दरवळता सुवास,
उदो ! उदो ! अंबेच्या गजरात ॥

धनधान्यांन घरादारा भरली,
लक्ष्मीच्या पावलान समरुद्धि ईली ॥
देवीच्या महतीत नारी उमाजली ॥

वर्षा भाबल.

– रचना : वर्षा भाबल.
– संपादन : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अलका वढावकर ठाणे on माझी जडणघडण : ७८
पुष्पा कोल्हे on “अनोखी स्नेह भेट”