Wednesday, January 22, 2025
Homeलेखनवा भारत घडवू या !

नवा भारत घडवू या !

नोकरीच्या मागे धावणारी तरुणाई बघितली की असे वाटते, यांनी उद्योजकतेची कास का बरे धरू नये ? उद्योजक बनण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन, बँका, विविध महा मंडळे विविध उपक्रम राबवित असतात. भारत सरकारने तर या दृष्टीने “स्टार्टअप इंडिया” हा उपक्रम हाती घेतला आहे.

नुकतीच, १६ जानेवारी २०२५ रोजी स्टार्टअप इंडियाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिन’ म्हणून हा दिवस देशाच्या प्रगतीचा उत्सव साजरा करतो.

२०१६ मध्ये फक्त ५०० स्टार्टअपने सुरु झालेला हा प्रवास आता १५ जानेवारी २०२५ पर्यंत DPIIT ने १.५९ लाखांहून अधिक स्टार्टअप्सचा झाला आहे. त्यामुळेच “महाराष्ट्र लवकरच जगाची स्टार्टअप राजधानी बनेल,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

‘महाराष्ट्र राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टीम’ ही देशातील अव्वल क्रमांकाची इकोसिस्टीम आहे. अमेरिका आणि इंग्लंडनंतर जगातील तिसरा मोठा स्टार्टअप असलेला भारत म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

देशाच्या उत्पन्नात आणि रोजगारात स्टार्टअप्समुळे मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सनी १६ लाखांहून अधिक थेट नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली सारख्या प्रमुख केंद्रांनी या परिवर्तनाचे नेतृत्व केले आहे, तर लहान शहरांनी देशाच्या उद्योजकीय प्रगतीमध्ये वाढत्या प्रमाणात योगदान दिले आहे. वर्ष २०२४ मध्ये १२,००० पेक्षा जास्त पेटंट, १८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक, ७६ आय पी ओ आणि जागतिक इनोव्हेशन निर्देशांकात भारताने ४२ वा क्रमांक मिळवला आहे.

देशातील ७० टक्के स्टार्टअप हे ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवकांनी सुरू केले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत, एकूण ७३,१५१ मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये किमान एक महिला संचालक आहे. यामुळे भारतातील महिला उद्योजकांच्या प्रगतीचे दर्शन घडते.

महिला उद्योजकतेेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ स्टार्टअप योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून विविध विभागांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी विजेत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतच्या वर्क ऑर्डर दिल्या जातात.

सहभागी स्टार्टअप्सना क्लाउड क्रेडिट्स, विविध इव्हेंट्समध्ये प्रवेश, मार्गदर्शक, गुंतवणूकदार इत्यादींसारख्या इकोसिस्टम प्लेयर्सशी कनेक्ट होण्यासारखे इतर अनेक फायदे देखील मिळतात.

राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे हि नक्कीच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

राज्य सरकार स्टार्टअपना भेडसावणार्या गुंतवणूक, कुशल मनुष्यबळाचा पुरवठा, नवीन तंत्रज्ञान, विविध पूर्तता करायला लागणे अशा विविध समस्यांवर काम करत आहे.

स्टार्टअप इंडिया या योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर आतापर्यंत ४४०० तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप कंपन्यांनी नोंदणी केली आहे. सरकारच्या वतीने आतापर्यंत २५० पेक्षा जास्त ‘इनक्युबेटरांना’ मान्यता देण्यात आली आहे.

राष्ट्रीय तज्ज्ञांच्या सल्लागार समितीने सात संशोधन क्षेत्र, १६ तंत्रज्ञान बिझनेस इनक्युबेटर आणि १३ स्टार्टअप सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये हे सर्व सुरू होऊ शकतील. यामुळे देशातील स्टार्टअप विकासाची गती आणखी वाढण्यास मदत मिळणार आहे.

नवीन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या सर्वांना गती देण्यासाठी राज्य सरकार लवकरच इनोव्हेशन सिटी उभारणार आहे. महाराष्ट्रातील स्टार्टअप संस्कृतीला बळ देण्यासाठी आणि ‘इझ ऑफ बुकिंग बिझनेस’मध्ये सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन स्टार्टअप धोरण जाहीर करणार असल्याची घोषणाही केली आहे. या धोरणाचा कच्चा मसुदा जाहीर करण्यात आला आहे. दोन महिन्यांत यावर विविध सूचना आणि हरकती मागवून या धोरणाचा अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर अनेक स्टार्ट अप्स उद्योजकांनी लिस्टिंग करून भांडवल उभारणी केली आहे. शेअर मार्केट तसेच क्राऊड फंडिंग आहे, अँजेल इन्व्हेस्टर व व्हेंचर कॅपिटल आहे अशा एक ना अनेक भांडवल उभारणीच्या संधी आज स्टार्ट अप्ससाठी उपलब्ध आहेत.

स्टार्टअप इंडियाला मिळालेल्या प्रमुख योजना, क्षमता-निर्मिती प्रयत्न, भास्कर सारखे व्यासपीठ आणि स्टार्टअप महाकुंभ सारख्या कार्यक्रमांमुळे निम शहरी भागांसह सर्व क्षेत्रे आणि गावागावामध्ये स्टार्टअप्सना सक्षम बनवण्याची सुरुवात झाली आहे. भारत इनोव्हेशन मध्ये जागतिक नेता बनण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू ठेवत असताना, स्टार्टअप इंडिया कार्यक्रम आर्थिक वाढीचा एक प्रमुख चालक राहिला आहे.

श्री अमित बागवे

या विषयी मुंबई आकाशवाणी केंद्रावरून नुकताच एक छान वृत्तांत प्रसारित करण्यात आला आहे.आपण हा वृत्तांत
पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. अर्थ संकेत चे संपादक श्री अमित बागवे यांनी देखील या वृत्तांतात आपले मनोगत व्यक्त केले आहे.

तर चला, उद्योजक होऊ या, नवा भारत घडवू या.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments