Friday, May 9, 2025
Homeलेखनवा श्वास

नवा श्वास

मूळ सांगलीकर असलेल्या नयना निगळ्ये उच्च विद्याविभूषित विद्युत अभियंता असून गेली दोन दशके न्यूयॉर्क राज्यासाठी प्रदूषणरहित पर्यावरण अनुकूल ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे विकसन आणि व्यवस्थापन करीत आहेत.

सामाजिक कार्यातही सक्रिय असलेल्या नयना यांचे बालपण सांगलीमध्ये निसर्गाच्या सानिध्यात पार पडले. तिथेच लहानपणी त्यांना लेखन आणि कवितांची गोडी लागली आणि पुढे त्या सातत्याने लेखन करू लागल्या.

दीपावलीच्या शुभमुहूर्तावर आपल्या पोर्टलवर लेखनाचा श्रीगणेशा करताना त्यांना अत्यंत आनंद होत आहे.

आपल्या पोर्टल वरील लेखनाची सुरवात त्या त्यांच्या जीवनातल्या एका अत्यंत प्रेरणादायी अनुभवानी करू इच्छितात.

दोन वर्षांपासून करोनामुळे मुलांची शाळा घरून चालू झाली, सगळे सामाजिक कार्यक्रम बंद पडले. अमेरिकेत आधीच समाजात मोकळेपणाने मिसळण्याचे प्रसंग भारताच्या मानानं बरेच कमी. त्यातून मुलांचे शाळा, सहली, खेळ, मित्रमैत्रिणी, नातलग सर्वच नाहीसं झालं. त्यांच्या घरी गेले सात वर्ष रोज येणारी मुलांची नानी पण यायची बंद झाली. या सर्वाचा लहानग्या अनिषवर कुठेतरी खोलवर आघात झाला. नेहमी हसतमुख राहण्याचा प्रयत्न करणारा अनिष मनात खोलवर झुरत होता. त्यातच त्याच्या जुन्या आजारांनी डोकं वर काढलं आणि त्याला एक्झिमाचा अतिशय त्रास सुरु झाला.

अनिषला मध्ये मध्ये हॉस्पिटलाइझही करावे लागले. कोविदमुळे ट्रीटमेंटही व्यवस्थित होईना. शेवटी काही महिन्यांपूर्वी त्याला दर पंधरा दिवसांनी इंजेक्शन्स चालू केली. परिणामी त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं होतं. त्यांच्यापुढे परिणामकारी पालकत्व कसं करावं ? हा यक्षप्रश्न होताच.

नव्या उपायांनी अनिषची तब्येत सुधारू लागली आणि यावर्षी सप्टेंबरमध्ये एकदाच्या शाळा सुरु झाल्या. मित्र भेटणार म्हणून अनिषच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्याची मानसिक स्थितीही सुधारू लागली पण दुर्दैवाने पहिल्या काही दिवसातच त्याला शाळेत कोविदचा संसर्ग झाला. पुन्हा अनिषचं एकाकी आयुष्य सुरु झालं. आता तर घरात सगळेच विलगीकरणात होते.

अनिष आधीच तब्येतीने नाजूक असल्याने फारच आजारी पडला. पण यावेळी बरेच सकारात्मक विचार करत, आशादायी पुस्तकं वाचत हसतमुखानं राहिला आणि ठणठणीत बराही झाला.

लगेच त्याने दररोज नियमित व्यायाम आणि सकस आहाराला निश्चयपूर्वक सुरवात केली आणि चोवीस ऑक्टोबरला एका पाळण्याच्या शर्यतीत भाग घेऊन दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावलं. नयना घाबरून स्पर्धा बघायलाही जाऊ शकल्या नाहीत. कारण अनिषने लोकांच्यात मिसळावं यापलीकडे त्यांना काही अपेक्षाच नव्हत्या.

अनिष

अनिषला तीन पदकांसकट बघून त्यांना उस्फूर्तपणे सुचलेली कविता आपल्याला ही नक्कीच प्रेरणादायी वाटेल अशी आशा आहे.

आपल्या न्यूज स्टोरी टुडे परिवारात नयना यांचं मनःपूर्वक स्वागत करू या 💐
– टीम एनएसटी

#नवा_श्वास
ऑक्टोबर २४, २०२१

कधी मारवा हि मेघमल्हार गातो
नादते मंद सनई कधी चौघडे
प्रितीला मितीच्या रिती काय लावू
जिते का रितेची भावनांचे घडे

सुखाच्या उरी आकांत दाटताना
अंधार गिळतो निखळत्या सावल्या
निष्पर्ण तरूही वसंतात फुलती
आशा कितीक हृदयी झंकारल्या

जिथे मावळे सूर्य अस्ताचलाला
दिवेलागणीचे क्षितीजीं दिवे
मनाच्या कडेला पुन्हा झेप घेती
किती आठवांचे थवेच्या थवे

पुन्हा भास होतो पुन्हा त्रास होतो
पुन्हा श्रावणाचा कि मधुमास येतो
पुन्हा श्वास माझा नवा ध्यास होतो
नवा ध्यास पुन्हा नवी आस होतो

नवी आस तेव्हा नवा श्वास होतो
नवा श्वास होतो नवा श्वास होतो

– लेखन : नयना निगळ्ये, अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ +91 9869484800

RELATED ARTICLES

9 COMMENTS

  1. Nice to know that you are socializing with people
    in usa,every one is suffering in corona period, i think to overcome any disability is like an achievement,its just like how you feel after prolonged illness same as after psychological treatment or recovering fractured tooth or leg.

  2. नयना निगळ्ये,
    आज पहिल्यांदाच ब-याच काळानंतर आपली भेट होत आहे. तुझी कविता तुझ्या संवेदनशील मनाची आणि कुशाग्र बुद्धीची साक्ष देते. कनिता वाचून मला वालचंदमध्ये रहात असतानाचे दिवस आठवले. तुझ्या आई वडिलांना भेटता आले तसे तुलाही प्रत्यक्ष भेटता येईल असे वाटते. मी सध्या मिलपिटासमध्ये रहात आहे. तुझी ही कविता वालचंद हेरिटेज वेबसाईटवर प्रकाशित करता येईल का ते कळवावे. भावस्पर्शी कवितेबद्दल धल्नदाद.

  3. तुमच्या सहज मातृत्व भावना,कमी शब्दात फार छान व्यक्त झाल्यात.इतक्या लहान मुलाला इतकं सोसावे लागले ह्यासारखं काहीच वाईट नाही,पण ही वेदना त्याला बराच काही शिकवून गेलं असणार एव्हडं नक्की..

    फार छान लेख…

  4. Very good. Anish is a brave boy rather I will say he is fighter. He fought bravely with Corona. Nayana’s poem is beautiful as always. My best wishes are with her.

  5. अप्रतिम भावाविष्कार, मुलांच्या भावविश्वाशी आईच्या असलेल्या अतूट मनोबंधाची उत्कट अभिव्यक्ती!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अरविंद विनायक ढवळे on पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
शितल अहेर on रेघोट्या…
शितल अहेर on हास्य दिन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on समस्यांना कॉमा करा आणि पुढे जा…– अलका भुजबळ
सौ.मृदुलाराजे on कामगार चळवळीचा इतिहास