न्यूज स्टोरी टुडे च्या वाचकांना, रसिकांना दीपावली व नवीन वर्षाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा.🌹
शांता शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच संपन्न झाले.
त्यांच्या हस्ताक्षरात माझ्याकडे संकलित केलेली त्यांची “नवीन वर्षा तुझ्या स्वागता” ही कविता शुभेच्छा म्हणून आपल्याला पाठवतो आहे.
आपला
प्रा विसुभाऊ बापट. (कुटूंब रंगलंय काव्यात)
कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागुन पाने अविरत
गतसालाचे स्मरण जागता
दाटुन येते मनामधे भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
स्वतः स्वतःला देत दिलासा
पुसतो डोळे हसता हसता
उभा इथे मी पसरुन बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
– रचना : शांता शेळके
पुढे शांता शेळके यांनी मला त्यांच्या हस्ताक्षरात लिहून दिलेली कविता देत आहे.
शांताबाईंच्या हस्ताक्षरातील इतकी सुंदर कविता पाहायला मिळाली. धन्य वाटले. विशुभाऊ ंना धन्यवाद.
शांता शेळके यांची कविता खुप सुंदर आमच्या त्या प्रोफेसर होत्या आठवण आली
🌹सुंदर कविता 🙏🙏🌹