Wednesday, June 18, 2025
Homeबातम्यानवी मुंबईत रंगला साहित्य सोहळा

नवी मुंबईत रंगला साहित्य सोहळा

नवी मुंबईतील वाशी येथील साहित्य मंदिर सभागृहात नुकताच “राष्ट्रीय साहित्य सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन साहित्यिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिक्षण मंडळ संचालित नुतन ज्ञान मंदिर, कल्याण (पूर्व) शाळेच्या विद्यार्थ्यांनी कविता, चारोळ्या, ललित साहित्य, पोवाडा व हायकू या विविध साहित्य प्रकारचा अनोखा संगम असलेला ‘कोंदण कार्यक्रम‘ सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याप्रसंगी साहित्याचे विविध विविध प्रकार असलेल्या “रंग तरंग साहित्याचे” ह्या (ई-बुक) साहित्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांच्याहस्ते करण्यात आले. जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे, महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, लेखक स्वप्निल वाडेकर, उद्योजक प्रकाश गायकवाड, जेष्ठ साहित्यिक डॉ.नगमा जावेद मलिक, डॉ.ललिता जोगड, अभिनेत्री पूजा काळे, “रंग तरंग साहित्याचे” या साहित्य संग्रहाचे संपादक विलास देवळेकर, प्रकाशक सलमा खान उपस्थित होते.

तर साप्ताहिक अबुल कलाम चे संपादक मुश्ताक हाश्मी, शिव शंभो संघटनेचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख विजय भोसले, उद्योजक तथा समाजसेवक कुणाल भोईर यांची विशेष उपस्थिती होती.

या सोहळ्यात लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी सादर केलेला पोवाडा उपस्थितांची दाद घेऊन गेला. तर विजय मोरे व महेंद्र जाधव यांनी बहारदार गीते सादर केली.

यावेळी साहित्य संग्रहा करीता निवड करण्यात आलेल्या कविता, कथा, गझल, बालसाहित्य, लोकसाहित्य, ललित साहित्य, लेख चारोळ्या, उखाणे, पोवाडा व भारूड अशा विविध साहित्य प्रकारची रचना करणाऱ्या साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय साहित्य साधना पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य सेवा सन्मान पुरस्कार, मानबिंदू साहित्य गौरव पुरस्कार, राष्ट्रीय इनोव्हेटीव्ह मानबिंदू सन्मान पुरस्कार व इनोव्हेटिव्ह मानबिंदू सन्मान पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.या आगळ्या वेगळ्या साहित्य सन्मान सोहळ्या करीता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

सोहळ्याचे प्रास्ताविक ‘इनोव्हेटिव्ह मानबिंदू‘ प्रकाशनाचे प्रमुख व या सोहळ्याचे आयोजक एन.डी.खान यांनी केले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी अतिशय अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केली.

पुरस्कार सोहळ्याचे सुरेख सुत्रसंचालन सौ.शोभा गायकवाड तर विविध साहित्य प्रकाराचा अविष्कार असलेल्या कोंदण कार्यक्रमाचे निवेदन सौ.आस यानी अत्यंत रसाळपणे केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन संदीप पाटील यांनी उत्तमरीत्या केले.

या सोहळ्याचे औचित्य साधून सर्वच मान्यवरांचा पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात आला. तसेच साहित्य संग्रह ई-बुकचे संपादक श्री. विलास देवळेकर, ई- बुक ची निर्मिती करणारे अनिरुद्ध नागले व साहित्य संग्रहा करीता मुखपृष्ठ साकारणारे संदीप पाटील यांनाही सन्मानित करण्यात आले.

सदरहु सोहळ्याची संकल्पना साकारणारे एन.डी.खान यांच्या उत्तम नियोजनाचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. आभार प्रदर्शन महेंद्र जाधव यांनी केले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गुलअफरोज खान, कुणाल फीटकर, प्रविण माने, सौ.हेमलता पाटील, ईसा शेख, मृणालिनी माने यांनी विशेष परिश्रम घेतले.

इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनाने प्रकाशित केलेले रंग-तरंग साहित्याचे या ( ई-बुक) साहित्य संग्राहाची लिंक पुढे देत आहे. कृपया ती जरुर पहा.

https://heyzine.com/flip-book/d32dc3c527.html

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?