मराठी विज्ञान परिषद, नवी मुंबई आणि साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य मंदिर सभागृहात एक दिवसीय विज्ञान संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या विज्ञान संमेलनाचे अध्यक्ष मराठी विज्ञान परिषद मध्यवर्तीचे अध्यक्ष व आयसीटी मुंबईचे कुलपति प्रा. जे बी जोशी हे असतील. तर उद्घाटक मध्यवर्ती मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह श्री. अ.पां. देशपांडे मध्यवर्ती हे असतील. प्रमुख पाहूणे म्हणून अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त, श्री. उल्हास इंगवले हे असतील.
या परिषदेची रुपरेषा पुढील प्रमाणे आहे :
सकाळी : ०९-३० – १०.०० प्रतिनिधी नोंदणी आणि अल्पोपहार व चहापान
सकाळी :१०.०० – १०.१५ उद्घाटक : प्रा. जेष्ठराज जोशी, यांचे मार्गदर्शन
१०:१५ – ११.०० प्रमुख पाहूणे : श्री. उल्हास इंगवले सह-आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन, मुंबई.
विषय – अन्न व औषध प्रशासन व सामाजिक बांधिलकी.
सकाळी ११.०० – १२.३० उद्योजक बनू या : नामवंत व प्रस्थापित उद्योजकांचे नवीन उद्योजकांना प्रेरीत करणारे स्वानुभव, सहभाग : डॉ. सुरेश हावरे, श्री. रविंद्र नेने आणि श्री. अशोक खाडे.
१२.३० – ०१.१५ मौखिक आरोग्य – डॉ. उल्हास वाघ सदीप भाषण
दुपारी : ०१.१५- २.०० जेवण व विश्रांती.
दुपारी : २.०० – ३-३० कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंवाद सहभाग : डॉ. संजीव तांबे, प्रा. डॉ. माधवी ठाकूरदेसाई
दुपारी : ३.०० – ३.३० भेसळ कशी ओळखावी ? प्रात्यक्षिकावर आधारीत कार्यक्रम.
दुपारी : ३.३० – ४.१५ सायबर गुन्हे आणि प्रतिबंध – डॉ विशाल माने भाषण.
दुपारी : ४.१५ – ४-३० अल्पोपहार व चहा.
४.३० – ५.०० ऊर्जा क्षेत्र : भारतापुढील आव्हाने व संधी. डॉ महेश पाटणकर
५०० – ५-३० रिन्युएबल एनर्जी (नवीनीकरणक्षम) आणि एनर्जी एफिशिएन्सी : केंद्र आणि राज्य सरकारी लोकोपयोगी योजना. डॉ दिपक कोकाटे.
५.३० – ६.०० समारोप
मुलांसाठी कार्यशाळा : सुमारे ३०० विद्यार्थी लाभ घेतील.
सकाळी ९ – संध्याकाळी ६ पर्यंत इन्नोवेशन प्रयोगशाळा व त्यातील प्रयोग मविप मध्यवर्ती द्वारा.
दुपारी २-५ मुलांसाठी मोफत मौखिक व दंत चिकित्सा सल्ला व वेळ असल्यास उपचार डॉ. उल्हास वाघ डेंटल स्पेशॅलिटी आणि संकल्प नॅशनल मेडिकल रिसर्च अॅंड सोशल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. दुपारी दोन नंतर प्रयोग व आरोग्य शिबीर समांतर चालेल. मधल्या वेळेत विज्ञान रंजन व विज्ञान कथा व वैज्ञानिकांचे किस्से आलटून पालटून.
सादरकर्ते : अल्पना कुलकर्णी, मृणालिनी साठे आणि गौरी देशपांडे
सकाळी ११ ते संध्याकाळी ५.०० अन्न आणि औषध प्रशासनाची फिरती प्रयोगशाळा ज्यात अन्नातील भेसळ कशी ओळखावी हे प्रयोग प्रत्यक्ष दाखवण्यात येतील.
या सशुल्क संमेलनाची माहिती पुढील लिंक वर उपलब्ध आहे :
https://mavipanavimumbai.org/
या संमेलनाच्या निमित्ताने एक विशेष स्मरणिकाही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिन केंद्रबिंदू मानून “विकसीत भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान“ या संदर्भातील काही लेख जसे नविनीकरणक्षम ऊर्जा: सौर, अणू आणि इतर स्रोत. आजचे तंत्रज्ञान नॅनो टेक्नॉलॉजी, या बरोबरच “मनुष्याच्या शरीरात प्रवेश केलेल्या मायक्रोप्लॅस्टिक्सचे धोके”, “कचरा नव्हे ही तर संपत्ती”, “डावे उजवे यात अडकलेले प्रती जीवन” , ”देशोदेशीचा विज्ञान प्रसार”, “तुम्ही डिटर्जंट वापरता ? मग हे वाचा”, “आजचे गुन्हे सायबर गुन्हे”, “भारताचे कार्बन मार्केट” तसेच “विज्ञान तंत्रज्ञान आरोग्य आणि कृषि क्षेत्रातील नवीन काही” ही पानपूरके. इत्यादी विषय मांडणारी ही स्मरणिका प्रकाशित केली जाईल. ही स्मरणिका म्हणजे सर्वांसाठी अमूल्य ठेवा असेल.
मराठी विज्ञान परिषद, नवी मुंबई विभाग या पत्रकाद्वारे सामान्य नागरिक, गृहिणी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत आहे.
संपर्कासाठी पुढील दूरध्वनी क्रमांक व इ-मेलवर संपर्क करावा ही विनंती.
mvp.navimumbaivibhag23@gmail.com
डॉ. किशोर कुलकर्णी. ९८६९२१३७०३
krk_1949@yahoo.com
श्री. अजय दिवेकर, ९८१९०१७६३२ divekar.baba@gmail.com

अल्प परिचय
मराठी विज्ञान परिषद (मविप) एक नोंदणीकृत स्वायत्त संस्था असून विज्ञानाचा प्रसार व प्रचार तसेच सामान्य माणूस आणि लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य गेली ५८ वर्षे करत आलेली आहे. या लोकजागृतीच्या कार्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने या संस्थेला अनेक पारितोषिके देऊन गौरविले आहे. त्याच बरोबर अनेक सामाजिक संस्थांनी मविपचा वेळोवेळी या यशस्वी वाटचालीसाठी सत्कार केला आहे.
डॉ. वसंत गोवारीकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ, श्री. प्रभाकर देवधर यांच्या सारखे तंत्रज्ञ आणि प्रा. भालचंद्र उदगावकर यांच्या सारखे वैज्ञानिक व शिक्षणतज्ञ हे या संस्थेचे माजी अध्यक्ष होते.
सांप्रत प्रा. जेष्ठराज जोशी हे मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष आहेत. ‘मविप’चे महाराष्ट्रात व राज्याबाहेर मिळून ६५ संलग्न विभाग आहेत. नवी मुंबई हा त्यातला एक संलग्न विभाग आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800