महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई प्रादेशिक विभागाचे ८ वे द्वैवार्षिक अधिवेशन ७ नोव्हेबर २०२५ रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे सकाळी ९ तें २ या वेळात संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील व भारतातील ज्येष्ठ मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे यांनी नुकतीच दिली.
या अधिवेशनाचा विषय “ज्येष्ठ नागरिकांचे आंनदी जीवन व आरोग्य” असा असून या विषयातील तज्ञ् मार्गदर्शन करणार आहेत.

या निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्यात छापण्यात येणार असून, स्मरणिकेत ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी आवश्यक माहिती व उपयुक्त लेख असणार आहेत.

“सुख म्हणजे नक्की काय असते” फेम मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय जेष्ठ अभिनेते श्री. प्रशांत दामले यांना या अधिवेशनात फेस्कॉम मुंबई तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रवेशिकेसाठी इच्छुकांनी ९३२२४०१९६५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री पोटे यांनी सांगितले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
