महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई – नवी मुंबई प्रादेशिक विभागातर्फे नुकतेच जेष्ठ नागरीकांसाठी विविध स्पर्धांचे नेरूळ येथील जेष्ठ नागरिक भवनात आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धांचा शुभारंभ दि. २७ जानेवारी रोजी सकाळी झाला. उदघाट्न सोहळ्यासाठी श्री. अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष मुख्यालय – फेस्कॉम, महाराष्ट्र, जेष्ठ सदस्य श्री. विजय औंधे, श्री. सुरेश पोटे, अध्यक्ष, फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभाग हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सर्व मान्यवर पाहुण्यांनी स्पर्धकांना आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेला सुरुवात साली. चित्रकला, नाट्याभिनय, नाट्य अभिवाचन, समुह नृत्य, कथाकथन आणि उत्स्फूर्त वकृत्व स्पर्धा संपन्न झाल्या.
कथाकथन आणि वकृत्व स्पर्धेसाठी श्रीमती आर्या आपटे आणि श्री पांडुरंग मुळीक यांनी परिक्षण केले.
नाट्याभिनय आणि नाट्य अभिवाचन या स्पर्धांसाठी श्रीमती कल्पना देशमुख आणि श्रीमती हर्षिता बेंद्रे यांनी परिक्षण केले.
नृत्य स्पर्धेचे परिक्षण श्रीमती हर्षिता बेंद्रे, तसेच चित्रकलेचे परिक्षण श्रीयुत अजय खंदारकर यांनी केले.
स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
दिनांक २८ आणि २९जानेवारी रोजी सकाळी ९.३० पासून कॅरम स्पर्धा झाल्या. त्याच वेळेस दुसऱ्या दालनामध्ये बुद्धिबळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
कॅरम परीक्षक म्हणून श्री रवींद्र पारकर व बुद्धीबळ परीक्षक म्हणून कृतिका पुस्तिके यांनी काम पाहिले. सुभाष बारवाल, संजय बर्वे यांनी कॅरम स्पर्धे साठी मदत केली.
स्पर्धकांच्या एकूण उत्साह बघून असे वाटले की वेळ आणि दिवस कमी पडतील की काय ? परंतु श्री पोटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय योग्य नियोजन यामुळे आनंदी व खेळीमेळीच्या वातावरणात संपूर्ण स्पर्धा वेळेत पार पडल्या.
मुंबईमधून दहिसर पासून लालबाग, मुलुंड व नवी मुंबई ऐरोली ते बेलापूर व पनवेल मधील जवळपास ३५० स्पर्धेकांनी भाग घेतला. या कार्यक्रमाची दखल महाराष्ट्रात घेतली गेली असून उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा अश्या प्रकरच्या स्पर्धा व्हायला हव्यात अशी अपेक्षा ज्येष्ठानकडून करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या नियोजनावर प्रतिक्रिया देताना, सौ. रश्मी मोहिते यांनी तर “स्पर्धेतील एकंदरीत वातावरण व उत्साह तसेच तेथील सकाळचा अल्पोपहार व दुपारचे जेवण याचा स्वाद घेताना आम्हाला माहेरची आठवण झाली” अशी सुंदर प्रतिक्रिया दिली.
श्री महेश शर्मा यांनी सर्वच गोष्टीचे कौतुक केले .वास्तू पासून योजनाबद्ध नियोजन तसेच अध्यक्ष श्री सुरेश पोटे यांची संपूर्ण वेळ उपस्थिती त्यांना फार भावली. अशा प्रकारच्या भावना जवळजवळ सर्वच स्पर्धकांच्या चेहऱ्यावरून दिसत होत्या.
या सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी, श्रीमती प्रतिभाताई सराफ, श्रीमती स्वाती फडके, श्रीमती लता पोवार, श्री दत्ताराम आंब्रे, श्री बळवंत पाटील , श्री मुकुंद फडतरे, श्री विजय औंधे व श्री प्रभाकर गुमासते यांचे विशेष आभार मानण्यात आले.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० सायन येथील डी एस हायस्कूलमध्ये गायन स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेला सुद्धा मोठ्या संख्येने स्पर्धकांची नोंद झाली आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800