भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान, नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ येथील निसर्गरम्य पुष्पपर्णी नर्सरीत पुस्तक प्रकाशन आणि नवरंग म्युझिकल सर्कलचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर श्री. विलास राजुरकर यांनी स्वागत गीत गाऊन सोहळ्याची मंगलमय सुरुवात केली.
यावेळी श्री. गज आनन म्हात्रे लिखित आणि रंगधनु प्रकाशित “हवेली की अनकही दास्तान” या हिंदी कादंबरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

गायक श्री. संतोष थळे यांनी गायलेल्या गणेश गीताने नवरंग म्युझिक सर्कलचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रा. प्रतिभा सराफ, प्रा. एल बी पाटील, श्री गज आनन म्हात्रे, डाॅ. प्रा. अजित मगदुम, नेरूळ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. विकास साठे आदी मान्यवरांनी समयोचीत मार्गदर्शन केले.

श्री. घनश्याम परकाळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छान केले.

सोहळ्यास गुणग्राहक श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता शेवटी राष्ट्रगीत गाऊन करण्यात आली.
— लेखन : सुभाष कोडोलकर. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
