अनाथ व आदिवासी मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्य, युवा सक्षमीकरण व महिला सशक्तीकरण यां क्षेत्रात, त्यांच्या नवी मुंबईतील श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट नेरुळ’ ही सार्वजनिक सेवाभावी नोंदणीकृत संस्था गेल्या २६ वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे.

या संस्थेचा २७ वा वार्षिक कार्यक्रम, बुधवार, दि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘आगरी कोळी सांस्कृतिक भवन, प्लॉट क्र. ९, सेक्टर- २४, नेरुळ, नवी मुंबई- ४००७०६ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.

वनमंत्री श्री गणेश नाईक हे या कार्यक्रमाचे मुख्य अथिति असून यात इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थित संस्थेच्या विद्यार्थ्यांचे कला व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच संस्थेने अंध जणांना सोबत घेऊन सुरु केलेल्या ‘आलाप’ या वाद्यवृंदांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

तरी शुभचिंतकांनी व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थाना व दृष्टीहीन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या विश्वस्थांनी केले आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800