शिशिराची पानगळ सम्पली आणि वसंताची चाहूल हलकेच मनाला आल्हाददायक जाणीव करून देत चोर पावलांनी नवा पालव घेऊन आली.
शिशिर सम्पला आणि कोकिळेच्या मधुर स्वरांनी निष्पर्ण वृक्षांची कोवळी पालवी जणू तो मधुर स्वर ऐकण्यासाठी फांद्याफांद्यावर डोकावू लागले. किती अद्धभूत चमत्कार हा निसर्गाचा.
निसर्गाच्या प्रत्येक कृतीतून आपण काहीतरी शिकण्यासारखं असते, हो ना ? शिशिर गळती शिकवून जाते, जूनं ते सोडून द्या. आपल्यापासून वेगळं करा. अगदी त्या निष्पर्ण वृक्षां प्रमाणे ….. जुना पाचोळा आपल्यापासून वेगळा करा आणि नाविन्याचे आनंदाने, कोकिळेच्या मधुर स्वरांनी स्वागत करा. जुनं ते सोडून द्यावे आणि नवं ते अंगिकारावे. किती मोलाची शिकवण आहे ही निसर्गाची…….
निसर्गराची हीच शिकवण सगळेजण आचरणात आणूया. गतवर्षी च्या रुक्ष आठवणींना, जुन्या विचारांना, मनातील हेव्यादाव्याना, नात्यातील कडवटपणाला, आपल्यातील अहंकाराला आपल्यातून वेगळं करू आणि नव्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करू. मंगलमय स्वरांच्या लहरी, मंगलमय विचारांच्या लहरी पसरवू आणि नव्या जोमाने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करू. हीच त्या निसर्गाची शिकवण आचरणात आणू या ………..
नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना आनंददायी जावो हीच प्रार्थना.

– लेखन : सविता कोकीळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि सुंदर नववर्ष संकल्प.