नमस्कार मंडळी.
आज आपल्या पोर्टल वर, आपल्यासाठी नव्या असलेल्या कवयित्री सौ.सीता विशाल राजपूत यांच्या कवितांचा आस्वाद घेऊ या.
अल्प परिचय – :
सौ.सीता विशाल राजपूत या समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि इंग्रजी अशा तीन विषयात एम ए झाल्या असून त्यांनी एम.एड देखील केले आहे. बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथील श्री.शंकर विद्यालयात त्या शिक्षिका आहेत. “न्यूज स्टोरी टुडे” परिवारात त्यांचे हार्दिक स्वागत आहे.
– संपादक
१. चष्मा
असाही एक चष्मा असावा
माझा बाप त्या चष्म्यातून दिसावा
किती बालपण सूंदर जगले
एक एक क्षण मी पुन्हा जगावा !!१!!
काय जीवन होते माझे
साक्षात देवाला हेवा वाटावा
किती जन्माची पुण्याई माझी
विठू माऊली स्वत: भेटावा !!२!!
मनातून एक क्षण ही जाईना
प्रत्येक गोष्टींचा हट्ट धरला
बाप माझा कधीही ना हारला
कळलेच ना कधी तूम्ही हारवला !!३!!
निष्पाप प्रेम मिळाले मला
खरचं दादा कुठे तूम्ही गेलात
अर्थपूर्ण जिवन मला जगता आले
अचानक तूम्ही दिसेनासे झालात !!४!!
सर्व जग शोधून पाहिले
एकदा पण तूम्ही मागे न पाहिले
निघून गेलात पुढच्या प्रवासाला
काही कारण आता नाही राहिले !!५!!
२. काजवा
नभी दिसे अंधकार
चंद्र लपला ढगात,
तरी कठून चांदणे
सहयाद्रीत पडतात !!१!!
नसे कुठेच आभास
काजवा रे चमचम,
देई दिव्य हा प्रकाश
पायी वाजे छम छम !!२!!
आज भासे धरा मज
स्वर्गीय राज तिलक,
स्वर्ग अनुपम साज
वेगळा भासे मुलक !!३!!
प्रिये ग हातात हात
गोंदन भासे चांदण,
काजव्याची असे रात
स्वप्न पूर्ण रे गुजंण !!४!!
काजव्याची संगतीत
मनास वाटे राजस,
खेळू रास मस्तीत
जगलो मी झकास !!५!!
काजव्याचा सागर
निशा मंतरली होती,
दिव्य तेजस अपार
मनातील फुले प्रिती !!६!!
३. चूल
चुलीत शिजते अन्न
मन होते रे प्रसन्न,
चुल नाही फक्त सुन्न
जगण्यासाठी देते अन्न विभिन्न !! १!!
आई करते स्वयंपाक
भासे मज अन्नपूर्णा रूप,
बाप आणतो लाकड
आग वाटे चैतन्य स्वरूप !! २!!
चूल नाही साधीसुधी
भागवते भुकेल्याची भुख,
मानीत नाही गरीब श्रीमंत
देते सर्वाना पोटभरून सुख !! ३!!
चंद्र मोळी झोपडीत
संसार केला सुखात,
नाही पसरला कधी हात
राहिले कधी जरी दुःखात !! ४!!
दुष्ट, नकारात्मक विचार
जाळीले मी माझ्या चुलीत बघ
स्वप्न पूर्ण केले जीवनात
साक्षी आहे चुलीतील आग !! ५!!

— रचना : सौ.सीता राजपूत. अंबेजोगाई, बीड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खुप छान ❤️
व्हा खूपच सुंदर अप्रतिम कविता आहेत. खरच असा चष्मा असायला पाहिजे की आपला बाप दिसला पाहिजे बापाने केलेले कष्ट दिसले पाहिजे.आई वडिलांमुळे आपण आपलं बालपण आनंदात जगत असतो. खरच प्रत्येक क्षण असा असतो की आपल्या आई वडील यांच्या कडे कोणत्याही गोष्टीचा हट्ट धरत असतो.खूप छान अप्रतिम कविता लिहिली आहे.एवढच नाही तर काजवा आणि चूल ह्या ही कविता खूप छान अप्रतिम आहेत.आकाशात चंद्र ढगात लावतो अंधार पडला तरी चांदण्या दिसतात.
चूल नसती तर अन्न मिळालं नसत चूल आहे म्हणून आपण अन्न शिजवून खातो खरच 3 ही कविता खूप छान अप्रतिम कविता लिहिल्या आहेत.तुम्हाला पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर रचना आहेत… आपल्या प्रतिभेला सलाम मॅडम! दर्जेदार रचना 💐💐💐💐💐💐