भारतीय प्रशासकीय सेवा अर्थात आयएएस मध्ये नवीन १० अधिकारी दाखल झाले आहेत. हे सर्व अधिकारी २०१९ च्या तुकडीचे आहेत.
अत्यन्त स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठित भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर, महाराष्ट्र संवर्ग मिळालेल्या आणि आपले प्रशिक्षण संपवून सेवेत दाखल होणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांची प्रथम नियुक्ती आदिवासी भागात करण्याचे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. त्या प्रमाणे या अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे.
१) श्री शुभम गुप्ता – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड, तथा सहायक जिल्हाधिकारी, येटापल्ली जिल्हा गडचिरोली.

२) श्रीमती तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तथा सहायक जिल्हाधिकारी, धुळे .
३) डॉ. मैनाक घोष – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार तथा सहायक जिल्हाधिकारी, तळोदा,जिल्हा -नंदुरबार.
४) श्रीमती मनीषा आव्हाळे – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर
तथा सहायक जिल्हाधिकारी, सोलापूर.

५) श्री अंकित – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी, तथा सहायक जिल्हाधिकारी, अहेरी, जिल्हा गडचिरोली.
६) श्रीमती मीनल करनवाल – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार, तथा
सहायक जिल्हाधिकारी, नंदुरबार. जिल्हा -नंदुरबार.
७) श्री सावंतकुमार – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद, तथा सहायक जिल्हाधिकारी, पुसद,नंदुरबार. जिल्हा -यवतमाळ.
८) श्री वैभव वाघमारे – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, तथा सहायक जिल्हाधिकारी, धारणी, जिल्हा – अमरावती
९) श्री अनमोल सागर – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, तथा सहायक जिल्हाधिकारी, देवरी, जिल्हा – गोंदिया
१०) श्रीमती आयुषी सिंह – प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार, तथा सहायक जिल्हाधिकारी, जव्हार, जिल्हा – गोंदिया
या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या
https://newsstorytoday.com/
या वेबपोर्टल तर्फे यशस्वी व लोकाभिमुख सेवेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
– देवेंद्र भुजबळ 9869484800.