किती छळशील अपराध नसताना या देहाला
सुखासाठी व्याकुळ जीव हा तरी सावरते मनाला
वेदनेच्या सागरात मी शोधते सुखाला
नाही इथे कुणी कुणाचे दोष त्या नशिबाला
आज ही मी प्रतीक्षेत सांजवेळेला
उमेद जागते सुखाची क्षणिक भावनेला
अंधारल्या कुशीत बिलगते काळोखाला
कधी पंख फुटती भावनेला आकाश कवेत घ्यावयाला
वेळी अवेळी आठवांतून पाझरून अश्रुला
सुख दुःखाचा नाही कधीच हिशेब ठेवला
झाले गेले विसरून सारे क्षणिक त्या वेळेला
आता तरी तरसवू नको माझी या मनाला

– रचना : सौ. निलम सदानंद पाटील. वसई, पालघर
छान कविता केली आहे लेखणीतून समर्पक भाव उतरले आहेत🌹🌹👌👍💐💐
🌹अप्रतिम 🌹
खूपच छान कविता, भावनास्पर्शी.
धन्यवाद