लेखिका, कवयत्री सौ वर्षा भाबल यांनी आम्हा
उभयतांना म्हणजेच श्री. देवेंद्र व सौ.अलका भुजबळ यास त्यांच्या कवितेच्या माध्यमातून लग्नगाठीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्या पुढे देत आहे. सौ वर्षा भाबल यांना आम्हा उभयतांकडून
मनःपूर्वक धन्यवाद.
लग्नगाठीच्या बंधनात,
नवा दिवस ॥
सतेज किरण,
नव्या पहाटेत ॥
आठवणींच्या चारोळीत,
निसर्गही अवतरला ॥
आनंद बहरुन,
सातजन्मी आशीर्वाद ॥
काव्यांच्या ओळीत,
समाजसेवी दांपत्य ॥
समाजभूषण जोडी,
पोर्टलच्या सेवेत ॥
सुख -दुःखी प्रसंगात,
सावरलेत एकमेकांना ॥
झालात सावली,
अखंडित प्रेमात ॥
बंध रेशमाचे,
नात्यात गुंफलात ॥
जबाबदारी संसारात,
नाते विश्वासाचे ॥

– रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तुम्हां दोघांना माझ्यातर्फे खुप खुप हार्दिक शुभेच्छां. तुमचे उभयतांचे जिवन सुखाचे, सुआरोग्याचे व समृद्धिचे जावो. व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ह्या सदिच्छां. जगांतील सर्व मराठी भाषीकांना तुमच्या वेबपोर्टलवर एकत्र आणण्याचे तुम्ही उभयता जे बहुमोल कार्य करत आहांत त्याला भरघोस यश येवो.
अलका भुजबळ उभयतांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षा भाबल ने केलेली कविता खूपच छान.
अलका भुजबळ उभयतांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा