थोर व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांची 24 ऑक्टोबर रोजी जयंती साजरी झाली.
🌿 आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन जग भर प्रसिद्घ आहे. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे .या अनुषगांने आर के. लक्ष्मण यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने नांदेड वाघाळा महानगरपालिकेने माता गुजरीजी विसावा ऊद्यानात आर के. लक्ष्मण यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, आर के लक्ष्मण प्रेमी अशोक चव्हाण यांच्या हस्ते 15 ऑगष्ट 2021 रोजी या पुतळ्याचे
अनावरण करण्यात आले. कॉमन मॅन चा हा पूर्णाकृती पुतळा नांदेडच्या वैभवात भर घालत आहे.
आर. के. लक्ष्मण हे दीर्घकाळ व्यंगचित्रे काढणारे बहुधा एकमेव व्यंगचित्रकार असावेत. त्यांचा ‘कॉमन मॅन’ गेल्या पन्नास वर्षातील देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचा, साक्षीदार आहे. चौकटीचा कोट आणि धोतर अशा पेहरावातील त्यांची छबी सतत कायमच सर्वांच्या लक्षात राहिली आहे.
तल्लखपणे सामाजिक व राजकीय जीवनातील विसंगती शोधून काढणारे फार थोडे व्यंग्यचित्रकार या देशात. होवुन गेले त्या पैकीच आर के लक्ष्मण होत.
त्यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन🙏
– टीम एनएसटी 9869484800