Thursday, March 13, 2025
Homeबातम्यानांदेड नगरीत पत्रकार संमेलन

नांदेड नगरीत पत्रकार संमेलन

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल चे १८ वें प्रदेश संमेलन २४ डिसेंबर २०२३ रोजी नांदेड शहरातील नरहर कुरुंदकर सभागृह येथे सकाळी १०ते ६ या वेळेत होणार आहे.
संमेलनात पत्रकारांना मार्गदर्शन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे जाणकार, वरिष्ठ पत्रकार जतिन देसाई , माहिती खात्याचे निवृत्त संचालक व ‘न्यूज स्टोरी टूडे’ या वेबपोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांची उपस्थिती लाभणार आहेत.

संमेलन चार सत्रात होणार असून….

पहिले सत्र उद्गघाटन व पत्रकार परिचय (माझी पत्रकारिता),

दुसरे सत्र वरिष्ठ पत्रकार मुलाखत व चर्चेचे असेल,

तिसरे सत्र “पत्रकारिता काल, आज आणि उद्या” या विषयावर उपस्थित पत्रकारांच्या मार्गदर्शनाचे असेल,

चौथे सत्र समारोपचे असून राज्यातील पत्रकार व मान्यवर यांचा सन्मान यावेळी केला जाईल.

राज्यातील पत्रकारांनी, नांदेड पत्रकार संमेलनास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष ईश्वर हुलवान, कार्याध्यक्ष राहुल कुलट, प्रदेश उपाध्यक्ष हनुमंत देसाई, श्रीकांत बाविस्कर, सरचिटणीस गोविंदसिंग राजपूत, जिल्हाध्यक्ष प्रा.साहेबराव बेळे, सचिव केशव कांबळे, राज्य संपर्क प्रमुख नितीन गुंजाळकर, विभागीय अध्यक्ष कालिदास अंतोजी, उपाध्यक्ष गौतम लंके यांनी केले आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Shrikant Pattalwar on कविता
शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित