चला जाऊ
वारुळाला
दूध लाह्या
घालू त्याला
रांगोळीत
नाग नक्षी
जन होती
ते सुरक्षी
नागोबास
नका मारू
कृषकास
नेई तारू
उंदिरांचा
नायनाट
रक्षणात
त्याचा थाट
कालियाचे
मर्दनात
संरक्षण
केले त्यात
श्रावणाच्या
पंचमीला
नाग सण
आठविला
कृष्ण पूजा
करतात
पाच फण्या
काढतात
तवा नको
ठेवायला
विळीवर
चिरायला
नाग पूजा
ही करावी
गहू थोडी
पसरावी
गारुड्याला
दान द्यावे
वस्त्र अन्न
ही अर्पावे
नव नाग
कर्कोटक
शंखपाल
नि तक्षक
– रचना : सौ शोभा प्रकाश कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख कविता.चल गं सखे…कवितेची आठवण येते.