Homeबातम्यानागपूर : महिलांच्या मूत्रपिंड आरोग्यावर परिसंवाद

नागपूर : महिलांच्या मूत्रपिंड आरोग्यावर परिसंवाद

नेफ्रोलॉजी सोसायटी, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागपूर येथे “महिलांच्या मूत्रपिंडाचे आरोग्य” या विषयावर एका परिसंवादाचे यशस्वी आयोजन केले.

अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. नैनेश पटेल यांनी विषयाची ओळख करून देतांना महिलांच्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर मूत्रपिंडाशी संबंधित आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी बहुविद्याशाखीय सहकार्याच्या वाढत्या महत्त्वावर भर दिला.

डॉ. मनीष बलवाणी यांनी दीर्घकालीन मूत्रपिंड विकार आणि प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमधील गर्भधारणा यावर मार्गदर्शन केले.

डॉ. दिव्येश इंजिनियर यांनी गर्भधारणेतील मूत्रपिंडाचे आजार यावर चर्चा केली. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. शिवनारायण आचार्य, डॉ. अलका कुमार, डॉ. राजन बारोकर आणि डॉ. स्मृती गेडाम यांनी भूषवले.

नंतर च्या सत्रात डॉ. नितीन शिंदे यांनी गर्भधारणेतील मूत्रमार्गाच्या संसर्गावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले. डॉ. सदाशिव भोले यांनी मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या व्यवस्थापनातील नवीन औषधांवर सादरीकरण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. मोनाली साहू आणि डॉ. रश्मी शिंदे यांनी भूषवले.

डॉ. श्रुती पंडित कृपलानी यांनी रजोनिवृत्तीनंतरच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, रजोनिवृत्तीनंतरच्या मूत्राशयाच्या विकारांवर एक सर्वसमावेशक व्याख्यान दिले. या सत्राचे अध्यक्षस्थान डॉ. सूर्यश्री पांडे आणि डॉ. अनघा कुलकर्णी यांनी भूषवले.

संपूर्ण परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. मनोज धनोरकर आणि डॉ. तन्वी ठक्कर यांनी केले. नेफ्रोलॉजी सोसायटीचे मानद सचिव डॉ. अमोल भवाने यांनी परिसंवादाचा समारोप केला.

या परिसंवादात शल्यचिकित्सक, प्रसूतीतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ञ, तसेच अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि शैक्षणिक खोली व व्यावहारिक उपयुक्ततेसाठी त्याचे कौतुक करण्यात आले.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments