राज्यातील सेवा संस्थांचे काम समाजासमोर यावे आणि त्यांना समाजातून समर्थन व सहकार्य मिळवून देऊन त्यांची प्रभाव क्षमता वाढावी याकरिता ग्रामायण प्रतिष्ठान गत वर्षापासून नागपूर येथे अभ्युदय सेवा प्रदर्शनाचे नि:शुल्क आयोजन करीत आहे.
मागील वर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर फ्रेंड्स को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन १२ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सकाळी १२ ते रात्री ९ या वेळेत, तात्या टोपे हॉल, तात्या टोपे नगर, वेस्ट हायकोर्ट रोड येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
या प्रदर्शनातील सर्वच्या सर्व म्हणजे ५६ स्टॉल बुक झाले आहेत . त्यात मागच्या वर्षी सहभागी झालेल्या २४ संस्था आहेत. नागपूर शिवाय ठाणे, बदलापूर, पुणे, अहिल्यानगर, नंदुरबार, अमरावती, धारणी, मेळघाट, तिवसा, जळका, यवतमाळ, वरोरा चंद्रपूर, भंडारा, वर्धा अशा संपूर्ण महाराष्ट्रातून या संस्था आल्या आहेतच पण विशेष म्हणजे राजस्थान मधूनही एक संस्था सहभागी झाली आहे.
या संस्थांच्या स्टॉल मध्ये आरोग्य विषयक उत्पादने, दिव्यांग, महिला सक्षमीकरण, बाल विकास, ग्रामविकास, पर्यावरण, मानवी हक्क, कैद्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी संस्था, फासे पारधी यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या २ संस्था, बांबू काम करणाऱ्या २ संस्था मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या ३ संस्था, कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पिटल सेंटर चालवणारी संस्था, गोरक्षण अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था सहभागी होणार आहेत.

विदर्भातील समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी या संस्थांची कामे पहावीत म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. या येणाऱ्या विद्यार्थ्यांनी संस्थांचे कार्य पाहून तिथेच रील बनवण्याची स्पर्धा आणि मला आवडलेली एनजीओ वर लेख लिहिणे अशा दोन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्याचप्रमाणे समाजकार्य पदवीधर आपापले परिचय पत्रे घेऊन येतील. त्यांच्यासाठी तिथेच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाला विविध व्यावसायिक १२ तारखेला, नामवंत उद्योगांचे प्रमुख, त्यांच्या समाजकार्य विभागाचे आणि मनुष्यबळ विभागाचे प्रमुख यांनी १३ रोजी, व्यापारी वर्गाने रविवारी; दि.१४ रोजी भेट द्यावी अशी योजना आहे,
सर्व नागरिकांसाठी मात्र प्रदर्शन तीनही दिवस नि:शुल्क खुले आहे. येथे ते तज्ज्ञांशी संवाद व्हावा यासाठी वेगवेगळ्या वेळी तीनही दिवस व्यवस्थापन, डॉक्युमेंटेशन, अकाउंटिंग, संघटन, सी एस आर, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, लघुउद्योगतून रोजगार निर्मिती, शेती व आदि विषयाचे तज्ञ उपस्थित राहणार आहे.
अनेक शासकीय योजना, या स्वयंसेवी संस्थांनील राबवाव्या अशी अपेक्षा असते पण त्यांना माहिती नसते म्हणून या संस्थांना शासकीय योजनांची माहिती देण्याची व्यवस्था यावेळी करण्यात आली आहे.
या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी फ्रेंड्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने त्यांचे सभागृह निःशुल्क उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय तिरपुडे कॉलेज ऑफ सोशल वर्क, स्टुडंट्स फॉर सेवा यांचे सहकार्य लाभले असून महाराष्ट्र न्यूज 24 आणि राष्ट्रबाण हे माध्यम भागीदार आहेत.
ग्रामायणची माहिती :-
ग्रामायण प्रतिष्ठानने २०१२ मध्ये आपल्या कामाला सुरूवात केली. समाजात कार्य करणाऱ्या सेवा संस्थांना भेटी देणे हा उपक्रम सुरू होता. नागरिकांना सेवा कार्याशी जोडून देणारा देणाऱ्या या उपक्रमातून अनेक गोष्टी समोर आल्या. सेवा संस्थात उत्पादित होणाऱ्या मालाची विक्री व्हावी या दृष्टीने मग ग्रामायण सेवा प्रदर्शन सुरू करण्यात आले. सेवा प्रदर्शनाच्या माध्यमातून सेवा संस्था व मध्यम प्रतीच्या उद्यम संस्था यांच्या सहभागाने ग्रामायण प्रदर्शने सुरू झाली.
ग्रामायण प्रतिष्ठानने यापूर्वी ७ यशस्वी प्रदर्शनाचे आयोजन केले. मागील वर्षापासून सेवा कार्याचे वेगळे प्रदर्शन भरवायला सुरुवात केली. स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला बळकटी प्रदान व्हावी हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान दीडशे संस्थांशी जोडल्या गेले आहे. त्यातील निवडक सेवा संस्थांचे जलद मूल्यमापन करण्यात येऊन त्यांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
ग्रामायण चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुढील प्रमाणे आहेत :
अनिल सांबरे, डॉ चंद्रकांत रागीट, संजय सराफ, मंजुषा रागीट, राजेंद्र काळे, प्रशांत बुजोणे, मिलिंद गिरिपुंजे, रमेश लालवानी, अनुराधा सांबरे, सुरेखा सराफ, राजेश सोनटक्के, प्रणव सातोकर, विजय खटी.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800