Thursday, June 19, 2025
Homeलेख"निकाष"च्या लग्नाचा धूमधडाका

“निकाष”च्या लग्नाचा धूमधडाका

मला आठवत नाहीं कीं शेवटचं असं कुठलं लग्न मी अटेंड केलं, जिथे फक्त नवरानवरीच नव्हते तर सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, स्नेही उपस्थित होते ? खरंच या दोन वर्षात कोरोनाने जगभर किती उलथापालथ केली ते वेळोवेळी जाणवत रहाते. नाही का ?

मात्र नुकतेच निकाष यांच्या (निकिता आणि अक्षय) यांच्या लोणावळा येथे धूमधडक्यात झालेल्या विवाह सोहळ्यास उपस्थित रहाण्याची संधी मला मिळाली आणि मी धन्य झालो.

एकमेकांविषयीचा आदर, प्रेम, विश्वास, प्रगल्भता, नावीन्य, ओसंडून वाहणारा सर्वांचा उत्साह आणि घाई गडबडबडीत ही जुळून येणाऱ्या सर्व गोष्टी यामुळे भारतीय विवाह सोहळे जगभर प्रसिद्ध आहेत. आणि अगदी अशाच प्रकारे माझा भाचा अक्षय आणि निकिता यांचा विवाहसोहळा संपन्न झाला, जो कीं माझ्या प्रमाणेच सर्व उपस्थितांच्या कायम आठवणीत राहिल.

अक्षयच्या लग्नाचा हा प्रवास सुमारे एका वर्षा पूर्वी सुरु झाला. सध्या न्यूझिलंड मध्ये वास्तव्यास असलेला अक्षय आणि पुण्यात राहणारी निकिता या दोघांना एकमेकांची माहिती ‘कासार मॅट्रिमोनी.कॉम‘ या विवाह संकेत स्थळावर समजली आणि बाकी सर्व इतिहास आहे.

वर्षभर असंख्य झूम कॉल्स द्वारे ते एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट लग्नाच्या दोन आठवडे आधी झाली. तसं पाहिलं तर अक्षय चांगलाच खोडकर निघाला. त्याचे भाऊजी (बहिणीचे पती) आणि जवळच्या मित्राच्या मदतीने काही एक पुर्व सूचना न देता, तो निकिता च्या घरी आकस्मित धडकला, ते ही नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच, घरी येऊन त्याने आईवडिलांनाही आनंदाचा चांगलाच सुखद धक्का दिला. आपल्या लाडक्या मुलाला तीन वर्षानंतर आकस्मित आलेला पाहून त्यांना झालेला आनंद आणि निकितालाही बसलेला गोड धक्का म्हणजे लग्नाच्या व्हिडिओतील वाढलेली गंमतच होय.

प्रत्यक्ष विवाहसोहळा म्हणजे पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरेख संगम ठरला. सर्वांचा सहभाग, उत्साह या मुळे आठवडाभर सर्व अतिशय आनंदात होते. कोणीही थकलेले किंवा कंटाळलेले दिसत नव्हते. प्रत्येक जणच हा विवाहसोहळा अविस्मरणीय व्हावा या साठी पुरेपूर झटत होते.

काही व्यक्तींचा इथे उल्लेख करायलाच हवा. त्या म्हणजे अक्षय आणि निकिता चे आईवडील, ज्यांनी आपल्या मुलांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना त्यांच्या मर्जी प्रमाणे आयुष्य जगू दिले. अक्षय चे भाऊजी आणि त्याचा जवळचा मित्र शुभम, ज्यांनी त्याच्या कल्पना प्रत्यक्ष साकारण्यास मदत केली. तसंच निकिताची मावशी (सोनी) ही संपूर्ण विवाह सोहोळ्यात तिच्या सोबत राहून तिला मार्गदर्शन करत होती आणि साथ देत होती.

आता थोडंसं माझ्या विषयी… म्हणजेच या मजकुराच्या लेखका विषयी..
मी आणि माझा 20 वर्षाचा मुलगा, शौनक या लग्नासाठी खास अमेरिकेतून आलो होतो.
दोन गोष्टी प्रामुख्याने माझ्या मनात होत्या. एक म्हणजे, अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या माझ्या मुलाला पारंपरिक भारतीय विवाह सोहळा दाखविणे. आणि दुसरी म्हणजे अक्षय चा मामा म्हणून लग्न घटिकेवेळी त्याच्या पाठीशी उभे रहाणे.

लहान अक्षय ला एका तरुणाच्या रूपात वाढताना पहाणे हा एक माझ्यासाठी सुखद आनंदच होता. शिवाय त्याच्या म्हणण्या नुसार त्याचा आदर्श असलेला मी, त्याच्या जीवनातील नविन पाऊल ठेवते वेळीस हजर असणे ही अतीव आनंदाची गोष्ट होती.

निकिता आणि अक्षय यांनी स्वतःचे लग्न ठरवून आणि ते चांगल्या पद्धतीने पार पाडून तरुण तरुणीना एक नवी प्रेरणा दिली. अर्थात इथे मला भावी लग्न ठरवू इच्छिणाऱ्यांना एक विनंती करायची आहे, ती म्हणजे पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स चा कमीतकमी वापर आणि अन्नाची नासाडी टाळावी जेणेकरून कार्बनचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. पाणी आणि अन्न यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध आहेत. किमान पक्षी प्लास्टिक ची विल्हेवाट तरी आपण व्यवस्थित लावली पाहिजे.

अक्षय, निकिता, त्यांचे आईवडील आणि जी सर्व मंडळी अडीच दिवस चाललेल्या त्या सोहळ्यात उपस्थित होती त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद. अक्षय आणि निकिताच्या नवं जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.

महेश सासवडे

– लेखन : महेश सासवडे. अमेरिका
– संपादन : अलका भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार श्रीकृष्णकांत सासवडे सर , श्री अमोल सासवडे आणि परिवार

    महेश सासवडे
    सस्नेह नमस्कार.

    विवाह सोहळ्याचे वर्णन छान !

    फार सुंदर,दिशादर्शक आणि बोधजन्य विचार !

    नव विवाहित दाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आपण जागे कधी होऊ ?
शितल अहेर on पुस्तक म्हणाले…
सौ. सुनीता फडणीस on पुस्तक म्हणाले…
श्रीकांत पेटकर on जिचे तिचे आकाश… १२
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…