निघता निघता काळ म्हणाला जातो मी रे
काय कमविले काय गमविले विचार कर रे
निघता निघता शैशव इतके सांगून गेले
निर्मळता ही सहज मनाची सोडू नको रे
तारुण्याने पाय काढला शिकवून गेला
गुर्मी मध्ये राहू नको तू नाती जोड रे
आला आता काळ, प्रौढपण पुढे ठाकले
समजूतीच्या चार गोष्टींवर ध्यान ठेव रे
अवयव सारे थकले नि परवशता आली
धाव धाव केलीस गमावले स्वास्थ्य असे रे
अनेक गोष्टी केल्या तरी सुख न लाभले
हाताचे सोडून, नसे त्यासाठी धाव रे
वर्षे गेली, वेळ चालली कळले नाही
खरे खुरे आयुष्य मनुज जगला नाही रे
सरलेला तो काळ परत ना येणे आता
बघ ह्या आयुष्याला आणि शिकवण घे रे

– कवयत्री : राधा गर्दे. कोल्हापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे सोपं करून सांगितले शुगर कोटेड पील
जगण्याच्या धावपळीत जीवनातील आनंद आपण विसरून जातो हे जीवनसत्य सांगणारी सुंदर कविता.
आयुष्याची शिकवणी देणारी. छान कविता लिहिली… वाह….. लेखणीतून.. झरत रहावे. साहित्य सृजन
होत. रहावे… 👌🙏🏼
🌹खूप छान कविता 🌹
जीवनाचं वास्तव वर्णन केले आहे.
🌹धन्यवाद 🌹
राधा गर्दे जी
अशोक साबळे
खुप सुंदर कविता .जीवनाचे सत्य सांगणारी .
निघता निघता बरचं सांगणारी .
खुप सुंदर कविता .जीवनाचे सत्य सांगणारी .