जेष्ठ वैज्ञानिक स्व. चंद्रशेखर वेंकटरमन यांचा २८ फेब्रुवारी हा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील निजामपूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यालयाची विद्यार्थिनी भूमिषा पेटारे हिने राष्ट्रीय विज्ञान दिनाची माहिती सांगितली. तर साहिल कोकरे या विद्यार्थ्याने सी.व्ही.रमण यांनी लावलेल्या वैज्ञानिक शोधाची माहिती दिली.
अमृता वाळवी आणि मनस्वी दिवाने या विद्यार्थिनींनी विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा सादर केली.
प्राचार्य के.वाय. इंगळे यांनी भारताच्या उज्वल वैज्ञानिक परंपरेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली आणि उत्तम वैज्ञानिक बनण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
सुरुवातीला प्राचार्य के.वाय.इंगळे आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते स्व. चंद्रशेखर वेंकटरमन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.
यावेळी विज्ञान विभागातील अण्णासाहेब पाटील, किरण तिवारी, विवेक पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय या कार्यक्रमात गणित विभागाचे विष्णूदत्त, सुनीता जयसवार, मराठी शिक्षक सुनील बिरादार, संगणक शिक्षक मुकेश सुमन, संगीत शिक्षक केदार केंद्रेकर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800