Wednesday, September 17, 2025
Homeबातम्यानिबंध लेखन स्पर्धा

निबंध लेखन स्पर्धा

हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या पन्नासाव्या वर्धापनदिना निमित्ताने पुढील विषयांवर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.

१) भारताला आज मंदिरांची गरज आहे की विद्यापीठे आणि इस्पितळांची व का ?
२) भारताच्या संविधानानुसार धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणजे काय ?
३) पर्यावरण ऱ्हास थोपविण्यासाठी माझे योगदान.

सूचना :
१) निबंध लेखक यांचे वय १८ वर्षांच्या वर असावे.
२) निबंधाची कमाल शब्दमर्यादा १२०० शब्द असावी.
३) निबंध फक्त मराठी भाषेत लिहिता येईल.
४) निबंध फुलस्कॅप अथवा ए ४ आकाराच्या कागदावर एकाच बाजूने, सुवाच्च अक्षरात लिखित अथवा टंकलिखित असावा.
५) निबंधाची मूळप्रत पाठवावी, फोटोप्रत स्वीकारली जाणार नाही. निबंध ईमेलवर स्वीकारला जाणार नाही. टंकलिखित निबंधाच्या प्रत्येक पृष्ठावर स्पर्धकाने स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
६) स्पर्धकाने निबंधाला जोडून स्वतःच्या स्वाक्षरीसह स्वतःचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोडसह) वय, व्यवसाय, टेलिफोन नंबर व ईमेल लिहावा.
७) “सदर निबंध यापूर्वी कुठल्याही निबंध स्पर्धेत बक्षिसपात्र ठरलेला नसून निबंध मी स्वतः लिहिलेला आहे” असे प्रमाणपत्र लेखकाच्या स्वाक्षरीसह निबंधाच्या शेवटी देणे अनिवार्य आहे.

बक्षिसे :
तिन्ही विषयातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजयी स्पर्धकांना रोख रु.२५००/- रु.१५००/- आणि रु. १०००/- अशी नऊ रोख पारितोषिके आणि पहिल्या दहा क्रमांकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

सर्वोत्कृष्ठ निबंधास जगन्नाथ परळकर ट्रॉफी दिली जाईल. स्पर्धेसाठी परीक्षक नियुक्त केले जातील व त्यांचा निकाल सर्वांवर बंधनकारक राहील व निकालाला कोठेही आव्हान देता येणार नाही.

स्पर्धंकांनी आपला निबंध ३० एप्रिल २०२३ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावा.
आशा कुलकर्णी
महासचिव – हुंडाविरोधी चळवळ,
४ /५० विष्णूप्रसाद ‘बी’ सोसायटी,
शहाजीराजे मार्ग, पार्ले बिस्कीट फॅक्टरी जवळ,
विलेपार्ले (पूर्व). मुंबई -४०००५७
संपर्क दूरध्वनी : ०२२ -२६८३६८३४
भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२ अथवा ९८१९५३९१९३.
इमेल : antidowry498a@gmail.com.
Visit us at : www.antidowrymovement.com

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं