हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या पन्नासाव्या वर्धापनदिना निमित्ताने महाराष्ट्रातील प्रौढांसाठी (१८ वर्षांवरील व्यक्ती) पुढील विषयांवर खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
१) भारतीय लोकशाहीचे संवर्धन कां ? व कसे ? २) भारताच्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे महत्व.
स्पर्धेचे नियम
१) निबंधाची कमाल शब्दमर्यादा १२०० शब्द असावी.
२) निबंध फक्त मराठी भाषेत लिहिता येईल.
३) निबंध फुलस्कॅप अथवा ए ४ आकाराच्या आखलेल्या कागदावर एकाच बाजूने सुवाच्च अक्षरात लिखित अथवा टंकलिखित असावा.
४) निबंधाची मूळप्रत पाठवावी, फोटोप्रत स्वीकारली जाणार नाही. निबंध ईमेलवर स्वीकारला जाणार नाही.
५) टंकलिखित निबंधाच्या प्रत्येक पृष्ठावर स्पर्धकाने स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे.
६) स्पर्धकाने निबंधाला जोडून स्वतःच्या स्वाक्षरीसह स्वतःचे संपूर्णनाव , संपूर्णपत्ता (पिनकोडसह ) वय, व्यवसाय, टेलिफोन नंबर व ईमेल लिहावा.
७) “सदर निबंध यापूर्वी कुठल्याही निबंध स्पर्धेत बक्षिसपात्र ठरलेला नसून निबंध मी स्वतः लिहिलेला आहे” असे प्रमाणपत्र लेखकाच्या स्वाक्षरीसह निबंधाच्या शेवटी देणे अनिवार्य आहे.
बक्षिसे
दोन्ही विषयातील पहिल्या तीन क्रमांकांच्या विजयी स्पर्धकांना रोख रु. २५००/- रु. १५००/- आणि रु.१०००/- अशी सहा पारितोषिके आणि पहिल्या दहा क्रमांकांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. सर्वोत्कृष्ठ निबंधास जगन्नाथ परळकर ट्रॉफी दिली जाईल .
स्पर्धेसाठी परीक्षक नियुक्त केले जातील व त्यांचा निकाल सर्वांवर बंधनकारक राहील.या निकालाला कोठेही आव्हान देता येणार नाही.
स्पर्धंकांनी आपला निबंध ३० एप्रिल २०२४ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावा.
आशा कुलकर्णी, महासचिव
हुंडाविरोधी चळवळ, मुंबई,
४ /५० विष्णूप्रसाद ‘बी’ सोसायटी,
शहाजीराजे मार्ग, पार्ले बिस्कीट फॅक्टरीजवळ,
विलेपार्ले (पूर्व) मुंबई ४०००५७.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800