नवी मुंबईची ख्याती ही एकविसाव्या शतकातील शहर अशी आहे. देशात स्वच्छ शहर म्हणुन नवी मुंबई तिसर्या क्रमांकावर आहे. या सर्व बाबीं लक्षात घेऊन, आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत, नियोजनबद्ध विकासाची हमी देणार्या उमेदवारांनाच मत द्या, असे आवाहन माध्यमकर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांनी नुकतेच केले. नवराष्ट्र डिजिटल चे संपादक श्री मनोज भोयर यांनी, आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात विविध नागरिकांची मते आजमावली, त्यावेळी श्री देवेंद्र भुजबळ बोलत होते. नवी मुंबईतील वाढते डेटा सेंटर्समुळे पाणी आणि पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यातील पाण्याची गरज ओळखून नवी मुंबई महानगरपालिकेने दुसरे धरण उभारण्याची योजना आखली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यांनी महानगर पालिकेने दीर्घ मुदतीसाठी विरंगुळा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.

या आणि इतर मुलाखती आपण पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.
निवडून येणार्या उमेदवारांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, ते आम्हाला जरूर कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
