खानदेशी कन्या बहिणाबाई
सरोसोती विराजे तिचे मुखी
शाळा तिची निसर्गाची बोली
दिनरात शेतामधी कष्ट करी ||१||
ठाव घेई मनाच्या खाली
अनुभवाचे बोल बोली
मानसाचा माणूस कवा होईल
मुक्या जनावरांची जाणे बोली ||२||
संसारात हाताले चटके
तव्हा मिळे रे भाकर
मन वढाय वढाय
ओतली शब्दाची घागर ||३||
निरक्षर त्याले म्हनू नये
जीवनाचे घटीत अक्षराचे
पशुपक्षी प्राण्यासंगे टिपले
मायबोलीचे धन दिले बोलीले ||४||
— रचना : अंजली सामंत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800