बीज अंकुरता धरा आनंदली
नव्या बहरास पालवी फुटली
हरीत पर्णांनी वृक्ष बहरला
पसरे वाटेवर झिलमिल सावली ।।
ऋतू बदलाचा सोहळा आला
रंग उधळीत धरती नटली
लाल केशरी पिवळी तांबूस
रंगांनी अवघी सृष्टी सजली ।।
येता चाहूल पानगळीची
पानांचा पाचोळा भिरभिरला
निष्पर्ण वृक्ष तरी ताठ उभा
जगण्याची कला शिकवू लागला ।।
अनोखा नियम हा सृष्टीचा
निष्पर्ण वृक्षास पालवी कोवळी
जुने जाऊन नव्याचे आगमन
असे ही निसर्ग किमया आगळी ।।

– रचना : सौ. मोहना टिपणीस. पुणे, ह. मु.कॅनडा
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800