निसर्गाचा एकमेव
जगी चराचरी दाता
क्षूधा तृष्णा क्षमवितो
विश्वकर्मा ठरे त्राता
घन:श्याम कृषकाच्या
स्वरुपात शोभिवंत
दिनरात्र कार्यकर्ता
देश ठरे भाग्यवंत
जन बदलले आज
निसर्गाचा रोष वाढी
खवळल्या भरतीला
मार्ग भले बुरे काढी
निरपेक्ष रचनेत
विधात्याने रचलेली
घटनेच्या आधांतरी
खोल दरी खचलेली
लाव्हा उधळी मातीस
जल प्रलय पूरात
वारा वावटळ सूटे
जन जाती अंधारात
कांक्रिटच्या जंगलात
मृत्तीकेस नाही थारा
खवळतो अमापसा
खुळसट असा वारा
जना कळले महत्व
वृक्षवल्ली रोपणास
जन जागृती वाढते
गावोगावी असे ध्यास

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800