कधी कधी हिरवं पीक
चक्क वाळून टाकतो
शेतकऱ्यांची थट्टा करत
निसर्ग हा दूरुन पाहतो.
रात्रंदिवस काम
करणारा तो
रांगडा मातीत
मळत असतो
तुचं निसर्गा पक्का सोबती,
मग का ?
त्याच्यावर जळत असतो.
निसर्गा काय
नेमकं तुझ्या मनात
आम्हालाही थोडं कळू दे
जेवढं तुझ्या हातात
आहे तेवढं
तरी या कष्टाळू ला
पदरी मिळू दे.
उन्हातान्हात
झिंजणारा शेतकरी
नेहमीच सुखी
असावा हीच आशा
जीवाची पर्वा न करता
जगासाठी झिंज झिंजतो
त्याच्याच पदरी निराशा.
माणूस माणसाशी स्वार्थासाठी
वेळोवळी कसा
लढत असतो
शेतकरी मात्र
एकटाच जिद्दीने
निसर्गाशी खुशाल
नडत असतो.
– रचना : भागवत शिंदे पाटील. उक्कडगांवकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800