ऊगवून रोज सांगे,
दिनकर तो मजला,
हा प्रकाश बघ सारा,
तुजसाठीच बघ केला,
ह्या कोट्यावधी बघ वेली,
अन अनंत कोटी झाडी,
ते जल वाहती बघ नद्या,
साठते सागराऊदरी,
मीच तापवून जलाते,
नभ निर्मीती करतो आहे,
तुजसाठीच बघ सखया रे,
पाऊसही पडतो आहे,
ह्या डोंगरदऱ्या निर्मिल्या,
तुज सौंदर्य ते कळाया,
अन फुले, पाने नी पक्षी,
निर्मिले तुज रिझवाया,
फक्त समजून हे सारे,
तु समरसतेने जगावे,
हे वैभव सांभाळून सारे,
मज काही वेळ स्मरावे,
जन्मा नुसार कर्मे,
तु तुझी, ती शर्त करावी,
अन व्याकूळ होता मजला,
तू आर्त साद ती द्यावी..!!!

– रचना : हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
मस्त