Sunday, July 13, 2025
Homeबातम्यानॅट कनेक्ट : 4 मोठे पुरस्कार

नॅट कनेक्ट : 4 मोठे पुरस्कार

पर्यावरण विषयावर लक्ष केंद्रित करून काम करणाऱ्या नवी मुंबईतील एनजीओ नॅटकनेक्ट फाउंडेशनने मुंबई उपनगरीय प्रदेश (एमएमआर) क्षेत्रातील पाणथळ आणि स्थानिक पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या वैश्विक व्यवहारांवर आवाज उठवणाऱ्या अभियानाकरिता अमेरिका-स्थित ग्लोबी अवॉर्ड्सकडून चार पुरस्कार प्राप्त केले आहेत.

सॅन-फ्रान्सिस्को येथील ग्लोबी अवॉर्ड्सकडून 11 वेगवेगळ्या वर्गवारीत पुरस्कार देण्यात येतात. या क्षेत्रात जगभर काम करणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती “निवड प्रमुख” म्हणून प्रतिनिधित्व करतात.

लॉकडाऊनच्या काळात नॅटकनेक्ट तर्फे अभिनव अशा ‘डिजीटल अजीटेशन’ चे लॉन्च #wakeupforwetlands आवाहनासह करण्यात आले आणि त्याची नोंद रामसार कन्वेन्शन वेबसाईटने घेतली.

नॅटकनेक्टने कम्युनिकेशन एक्सलन्स वर्गात रौप्य पुरस्कार जिंकला आहे. तसेच नॅटकनेक्ट’चे संचालक बी एन कुमार यांना अभियानाकरिता चीफ कम्युनिकेशन ऑफिसर वर्गात कास्य पुरस्काराचा सन्मान प्राप्त झाला.

बी एन कुमार

नॅटकनेक्ट ‘ने यापूर्वी एमएमआर जैववैविधतेचे जतन करण्याविषयी जे अभियान चालवले होते, त्याला 13 व्या अॅन्युअल गोल्डन ब्रिज बिझनेस अँड इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत रौप्य पुरस्काराचा मान मिळाला होता.

नॅटकनेक्ट ‘च्या वतीने सरकारी यंत्रणांना कायम सावध करण्याचे तसेच अधिकाऱ्यांना कारवाईकरिता सक्रिय करण्याचे अविरत प्रयत्न करण्यात आल्याने ही संस्था चौथ्या ग्लोबी अवॉर्ड ‘मध्ये इंटरनॅशनल बेस्ट इन बिझनेस कॅटेगरी अंतर्गत कास्य पुरस्काराची मानकरी  ठरली आहे.

“नॅटकनेक्ट ‘ची टीम आणि सहकारी पर्यावरण नाशाविषयी अविरत आवाज उठवत असते. त्याचप्रमाणे शहर आणि देशाच्या हिताकरिता निसर्गाचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक जनजागृतीवर लक्ष केंद्रित असते, असे एनजीओ चे संचालक बी एन कुमार म्हणाले.
“यामुळे सहयोगी एनजीओ आणि नागरिकांसमवेत मोठ्या प्रमाणावर नि:स्वार्थ वृत्तीने प्रयत्न करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.

हरीत योद्ध्यांचा विरोध हा सामाजिक-आर्थिक विकासाच्या पायाभूत प्रकल्पांना नसतो. विकासाची किंमत पर्यावरण, सजीव तसेच रोजगाराला चुकवावी लागू नये याकडे त्यांचा कल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नॅटकनेक्टच्या एका तक्रारीत उरण पाणथळ जमीन, हजारो स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवास ऱ्हासाचा विषय लावून धरण्यात आला होता. याप्रकरणी केंद्रीय इनस्पेक्टर जनरल ऑफ वेटलॅंड यांनी चौकशी सुरु केली.

आगामी काळात तयार होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) वरील हवाई उड्डाणांचा फटका पक्ष्यांना बसणार असून त्यांचे अधिवास क्षेत्र म्हणजे पाणथळ जमीन संकटात सापडण्याची भीती व्यक्त केल्यावर पंतप्रधान कार्यालयाने नागरी उड्डयन विभागाला संबंधित विषयात लक्ष घालण्यास सांगितले.

पांजे पाणथळ जमिनीचे बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणून संवर्धन करण्याच्या नॅटकनेक्टच्या शिफारसीत लक्ष घालण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन आणि शहरी विकास विभागाला दिले. 183 वर्षे जुन्या बीएनएचएसने या संकल्पनेचे यापूर्वीच समर्थन केले होते.

Creating desert amind lush green mangroves – JNPT SEZ. NatConnect Picture

सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट, खारघर वेटलँड आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान सारख्या काही मंचांसोबत बीएनएचएस ‘च्या मार्गदर्शनाखाली नॅटकनेक्ट ‘च्या वतीने पहिल्यांदाच एमएमआर बायोडायव्हर्सिटी प्लान तयार करण्यात येत आहे. “आम्ही पाणथळ, खाडी, कांदळवन, डोंगर आणि मडफ्लॅटसह 20 पेक्षा अधिक मालमत्तांची यादी तयार केली. तसेच संरक्षण आणि संवर्धनाची आवश्यकता असलेल्या पक्ष्यांच्या प्रजातींचा शोध घेतला. या विषयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बीएनएचएस अंतीम ब्ल्यूप्रिंट तयार करेल,” असे कुमार म्हणाले.

श्री कुमार यांना मिळालेल्या गौरवाबद्दल आपल्या पोर्टलतर्फे मनःपूर्वक अभिनंदन💐

– टीम एनएसटी 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments