आपण हे जाणतोच की, नेदरलँड्स हा पश्चिम युरोपमधील निसर्ग सौंदर्याने नटलेला एक देश आहे. नेदरलँड्स हा नेदरलँड्सचे राजतंत्र (डच : Koninkrijk der Nederlanden) ह्या मोठ्या सार्वभौम राज्याचा एक घटक देश आहे. बेआट्रिक्स ही नेदरलँड्सची राणी व राष्ट्रप्रमुख आहे. सम्राट/किंग – विलेम-अलेक्झांडर (रॉयल उच्चता) आणि नेदरलँडची राणी मॅक्सिमा (मॅजेस्टी) या आहेत.
अॅमस्टरडॅम हे नेदरलँड्समधील राजधानीचे शहर आहे व हेग येथे डच सरकारचे मुख्यालय आहे.
किंग विलेम-अलेक्झांडर आणि त्यांची पत्नी राणी मेक्सिमाला तीन राजकन्या आहेत : राजकुमारी कॅथरिना-अमलिया, अलेक्सिया आणि अरिआन.
राजकुमारी कॅथरिना-अमलिया, नेदरलँड्सच्या राजतंत्राची भावी वारस आहे, ज्यात अरुबा, कुरानसॉ, नेदरलँड्स आणि सिंट मार्टेन हे घटक देश आहेत. किंग विलेम-अलेक्झांडर आणि नेदरलँड्सची राणी मेक्सिमा यांची मोठी मुलगी ही कॅथरिना-अमलिया या आहेत.

अमलियाने अलीकडेच हेगमधील क्रिस्टेलिस्क जिम्नॅशिअम सॉरग्लिव्हिएट येथे अंतिम परीक्षा उत्तीर्ण करून तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. शाही कुटुंबाच्या इन्स्टाग्राम खात्याने शाळा पूर्ण केल्यावर गुरुवारी राजवाड्यात डच राष्ट्रीय ध्वजाजवळ देशाचा ध्वज वाढवण्याच्या डच परंपरेत भाग घेत असलेल्या राजकुमारीचा व्हिडिओ सामायिक केला आहे.
नेदरलँड्सची भावी राणी राजकुमारी कॅथरिना-अमलिया अवघ्या १७ वर्षांची आहे, परंतु तिने २ दशलक्ष डॉलर्सच्या वार्षिक भत्याची ऑफर नाकारत आपले वेगळेपण दाखवून दिले आहे.
ती डिसेंबरमध्ये १८ वर्षांची होणार आहे. कायद्यानुसार आता राणीपदी अधिकृत शाही जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय तिला वार्षिक भत्ता दिला जाईल. परंतु डच पंतप्रधान मार्क रुट्टे यांना नुकत्याच पाठविलेल्या आणि एनओएसने प्रकाशित केलेल्या हस्तलिखीत पत्रात अमलियाने पैसे मिळवून घेतल्याबद्दल अस्वस्थता व्यक्त केली. सध्याच्या कोरोना महामारीत बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीररित्या कर्जात बुडालेले आहेत, आणि विद्यार्थ्यांकडे विशेषत: कोरोनाच्या या काळात खूपच कठीण वेळ आहे अशी अस्वस्थता तीने पत्राद्वारे व्यक्त केली आहे. अर्थातच यातून तीचे वेगळेपण सगळ्यांना दिसुन आले आहे.
फ्लॅगपोल्सवर स्कुलबॅग्स
नेदरलँड्समध्ये या महिन्यात युटस्लॅगॅगडाग (Uitslagdag) आहे. म्हणजेच डच ध्वज फडकावणाऱ्या ध्वजारोहणांवर लटकलेल्या स्कूलबॅग्ज तुम्हाला बहुतेक घरांवर पाहायला मिळतील. ह्या दिवसाचं वैशिष्टय असे आहे की, डच शाळांमधील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांनी त्यांची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे की नाही हे तुम्हाला या वरून जाणुन घेतां येईल.
तर या अनोख्या डच परंपरेचा नेमका अर्थ काय आहे ?…..
माझ्या एका डच मित्राने मला सांगितले की, विंडोबाहेर स्कूलबॅग लटकवणे असे दर्शवते की, ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत त्यांच्या घराबाहेरील फ्लॅगपोलवर तुम्ही एक स्कूलबॅग पहाल तेव्हा आपल्याला लगेच हे लक्षात येईल की, या घरात शिकणाऱ्या हायस्कूलच्या पदवीधर विदयार्थ्यांने आज अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि ज्या घराबाहेर स्कूलबॅग आणि डच ध्वज असलेले झेंडे नसतील अशा घरात राहत असलेला विद्यार्थी दुर्दैवाने पदवीधर होण्यास अपयशी ठरला आहे.
डच कुटूंबियांमध्ये आपल्या अपत्यांची अंतिम हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण करण्याची घोषणा करण्याची अनेक दशकांची परंपरा आहे. म्हणूनच, दरवर्षी जूनच्या दुसर्या आठवड्यात, या शुभवार्तेची घोषणा करण्यासाठी अनेक कुटुंब बॅकपॅकसह सजवलेले बरेच ध्वजबिंदू आपल्याला नेदरलॅंडस मध्ये पाहायला मिळतील.

– लेखन : प्रणिता अ. देशपांडे. द हेग, नेदरलॅंडस.
– छायाचित्रे सौजन्य : गेट्टी इमेजेस
– संपादन : देवेंद्र भुजबळ. +91 9869484800
Very good information