नमस्कार मंडळी.
न्युज स्टोरी टुडे पोर्टल सुरू होऊन बोलता बोलता येत्या सोमवारी, २२ जुलै २०२४ रोजी ४ वर्षे पूर्ण होत आहेत. कोरोना च्या भयंकर काळात लोकांना दिलासा देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढण्यासाठी सुरू केलेल्या या पोर्टल ने कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, आरोग्य, यश कथा, विश्व बंधुत्व यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला, करीत आहे आणि करीत राहणार आहे.
याचे फळ म्हणून लेखक, कवी, वाचक, या ना त्या प्रकारे वेबपोर्टल शी जोडल्या गेलेल्या व्यक्तींचे खूप प्रेम आम्हाला मिळाले आणि मिळत आहे. अनेक पुरस्कार आपल्या पोर्टल ला मिळाले आहेत. पोर्टल वर प्रसिद्ध झालेल्या काही लेखमाला पुस्तक रुपात प्रकाशित झाल्या आहेत तर काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
चार वर्षांच्या या वाटचालीत आपला सहभाग महत्वपूर्ण राहिला आहे. अतिशय निरपेक्षपणे आपण या वारीत सहभागी झाला आहात. त्यामुळे एका परिवाराचे स्वरूप या पोर्टल ला येत गेले.
चार वर्षपूर्ती निमित्त “न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ?” यावर आपण आपले अनुभव, मते, विचार सोमवार, दिं २१ जुलै, दुपारी ३ पर्यंत अवश्य लिहून पाठवा. शब्द मर्यादा ५०० शब्द इतकी असून आपल्या लेखनासोबत काही छायाचित्रे देता आल्यास ती ही अवश्य पाठवा.
तसेच आपल्या काही नवीन कल्पना, विचार, सूचना असल्यास त्या ही नक्की मांडा.
आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहोत.
आपली
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
News Story Channel हे आपले विचार मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे.नवनवीन विकास प्रकल्प, प्रबोधन आणि नवनिर्माणाचे सर्वत्र घडत असलेले प्रयत्न आणि साहित्यविषयक घडामोडींचे शिक्षण देणारे ते समर्थ विचारपीठ आहे.या सर्वसमावेशक चळवळीने चार वर्षे पूर्ण केली आहेत.अनंत काळासाठी याची वाटचाल चालत राहो हीच सदिच्छा.