Friday, November 22, 2024
Homeसेवा"न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ?" भाग - २

“न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ?” भाग – २

नमस्कार मंडळी.
न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ? या विषयी आपण काही बोलक्या प्रतिक्रिया काल वाचल्या. आज आणखी काही प्रतिक्रिया वाचू या. कालच्या आणि आजच्याही लेखकांचे मनःपूर्वक आभार.
             – संपादक

१. आ. भुजबळसर,

न्यूज स्टोरी टुडे पोर्टलला चार वर्ष यशस्वीपणे पूर्ण  झाल्याबद्दल हार्दिक अभिनन्दन.
माझा न्यूज स्टोरी टुडे पोर्टलशी अगदी इतक्यातच परिचय. आपण  माझ्या कविता, लघुलेखांना पोर्टल वर स्थान दिल्यामुळे माझे लेखन सर्व दूर जाण्यास मोलाची मदत झाली.मोठमोठ्या विचारवंत, साहित्यिक यांच्यासह आपण नवोदित, फारशी प्रसिद्धी नसलेल्या पण उत्तम साहित्याला प्रसिद्ध करून लेखकांचे मनोबल निश्चितच वाढवले, याचा खूप आनंद वाटतो. आपल्या पोर्टलवर अनेक  विषयांची माहिती तसेच चर्चा कळतात. देशविदेशातील वार्ता समजतात. बरंच वाचायला मिळतं. विचारसमृध्दी होते. काही महिन्यांपासून मी बाहेर देशी होते. त्यामुळे पोर्टल वाचू शकले नाही पण नुकतेच आले व आपल्या सर्वांगसुंदर पोर्टलला शुभेच्छा देण्याची छान संधी मिळाली. अशीच समृध्दी घडत राहो.आपण व सर्व  सहकार्य  करणाऱ्यांना मनःपूर्वक  शुभेच्छा !
— अरुणा दुद्दलवार. दिग्रस, यवतमाळ

२. न्युज स्टोरी टुडे पोर्टल ने आम्हाला काय दिले ?

या प्रश्नाचे उत्तर काय दिले नाही ? असा प्रतिप्रश्न करून देता येईल. या पोर्टलने आम्हाला खऱ्या अर्थाने परिपूर्ण साहित्यिक बनवले आहे. पोर्टल वरील सर्व सदरे सुंदर आहेत. खरेच या साऱ्यांसाठी मनापासून धन्यवाद.
— आशा दळवी. कवयित्री, लेखिका
दुधेबावी, जि.सातारा.

३. नमस्कार. आपल्या पोर्टलच्या ४थ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. आपल्या समस्त परिवारास निरोगी निरामय आयुष्य तसेच भरभराटीचे जावो हीच साहित्य शारदादेवी जवळ मनापासून प्रार्थना.
— नंदकुमार रोपळेकर. मुंबई.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments