Wednesday, July 2, 2025
Homeलेखन्यूज स्टोरी टुडे : अभिनव उपक्रम

न्यूज स्टोरी टुडे : अभिनव उपक्रम

न्युज स्टोरी टुडे या आपल्या वेबपोर्टल ला, आज २२ जुलै २०२४ रोजी ४ वर्षे पूर्ण होत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे पोर्टल मुळेच दीड वर्षापूर्वी न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन सुरू झाले आहे. तर लवकरच न्युज स्टोरी टुडे यू ट्यूब वाहिनी सुरू होत आहे. ४ वर्षे पूर्ती निमित्तानं पोर्टल च्या आजवरच्या वाटचालीचा हा मागोवा.
– संपादक

खरं म्हणजे, समाज माध्यमांकडे अजूनही पुरेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुख्यत्वेकरून करमणुकीचे साधन म्हणूनच त्याचा वापर होत असतो. पण हे समाजमाध्यम कल्पकतेने, गांभीर्याने वापरले तर त्याचा कसा विधायक वापर होऊ शकतो याचे उदाहरण म्हणून “न्यूज स्टोरी टुडे” www.newsstorytoday.com या आंतरराष्ट्रीय मराठी पोर्टलकडे बघता येईल.

या पोर्टलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ९० देशात पोहोचले असून ५ लाखाहून अधिक याचे व्ह्युज आहेत.

मराठी भाषा, बातम्या, लेख, साहित्य, संस्कृती, कला, पर्यटन, सेवा याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडले गेले आहेत आणि जोडले जात आहेत.

या पोर्टल वर आता पर्यंत दररोज एक लेख, बातमी, साहित्य तसेच काही विशेषदिन प्रसंगी दिनविशेष लेख, आता पर्यंत १००० हून अधिक कविता, तर वाचक लिहितात.. या सदरातून वाचकांची असंख्य पत्रे प्रसिध्द झाली आहेत.

प्रकाशित लेखमाला आता पर्यंत या पोर्टलवर पुढीलप्रमाणे प्रसिद्ध झाल्या आहेत….
१) प्रा डॉ किरण ठाकूर,पुणे : “बातमीदारी करताना” : ३५ भाग
२) डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका : थोर कवी व त्यांच्या कवितांवर आधारित “मनातील कविता” : २४ भाग
३) सौ वर्षा भाबल. नवी मुंबई : “जीवन प्रवास” : ३७ भाग
४) निवृत्त डीवायएसपी सुनीता नाशिककर, मुंबई : “मी, पोलीस अधिकारी” : ३० भाग
५) वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या जीवनावरील लेख माला.
डॉ राणी खेडीकर. पुणे : “लालबत्ती” : ४७ भाग
६) प्रा विसुभाऊ बापट. मुंबई : “कुटूंब रंगलंय काव्यात” : ५३ भाग
७) टिव्ही कलाकार गंधे काका. मुंबई : गिरनार परिक्रमा – ७ भाग
८) डॉ भास्कर धाटावकर. मुंबई : “माझी कॅनडा अमेरिका सफर” : ११ भाग
९) लेखिका प्रतिभा चांदूरकर. ठाणे : कथा माला, स्वप्नरंग स्वप्नीच्या : २१ भाग
१०) श्री हेमंत सांबरे. पुणे : “सावरकर समजून घेताना” : ५ भाग
११) प्रा डॉ विजया राऊत. नागपूर : “महानुभावांचे मराठी योगदान” : २५ भाग
१२)तनुजा प्रधान. अमेरिका : भावलेली गाणी : १२ भाग
१३) तृप्ती काळे. नागपूर : “महामारी आणि विश्वाचा नवोदय” : १५ भाग
१४) श्री प्रवीण देशमुख. कल्याण : “वर्धा साहित्य संमेलन” : १२ भाग
१५) श्री विकास भावे. ठाणे : “ओठावरली गाणी” : १०० भाग
१६) प्रिया मोडक. मुंबई : राग सुरभी : ३५ भाग
१७) प्रतिभा चांदूरकर. ठाणे : “अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून”
१८) मेघना साने. साने : “माझी ऑस्ट्रेलिया सफर”
१९) डॉ शार्दुल चव्हाण. मुंबई: आयुर्वेद उवाच : १६ भाग
२०) क्षमा प्रफुल्ल. नवी दिल्ली : सहज सुचलं म्हणून : ११ भाग
२१) प्रकाश चांदे. डोंबिवली : अवती भवती : ३९ भाग
२२) सुप्रिया सगरे. मुंबई : आमची युरोप सफर : २० भाग
२३) विलास कुडके. मुंबई : दुर्मिळ पुस्तके : ४० भाग

२४) देवेंद्र भुजबळ : मेरा जुता है जपानी : 14 भाग

या पोर्टलवर सध्या पुढील लेखमाला प्रसिद्ध होत आहेत.
१) सोमवार : जडण घडण : सौ राधिका भांडारकर. पुणे

२) मंगळवार : मी वाचलेले पुस्तक : सुधाकर तोरणे (निवृत्त माहिती संचालक)
३) बुधवार : साहित्य तारका : संगीता कुळकर्णी
४) गुरुवार : टाकाऊतून टिकाऊ : सौ अरुणा गर्जे. नांदेड
६) शनिवार : पालकत्व एक कला : डॉ राणी खेडिकर, अध्यक्षा, बाल विकास समिती, पुणे


या पोर्टलवर पुढील प्रमाणे नियमित सदरं प्रसिद्ध होत असतात….

१) पुस्तक परिचय
२) पर्यटन
३) हलकं फुलकं
४) चित्रसफर
५) आठवणीतील व्यक्ती
६) दिन विशेष
७) यश कथा
८) संस्था परिचय
९) “माहिती”तील आठवणी
१०) ललित
११) पाककला
१२) सामाजिक संस्था परिचय.

इंग्लंड मधील लेखिका लीना फाटक घरी भेटायला आल्या.
एक हृद भेट.

या पोर्टलवर आता पर्यंत पुढील विशेषांक प्रकाशित करण्यात आले आहेत.

१) डॉक्टर म्हणजे देव
२) आषाढी एकादशी
३) स्वातंत्र्य दिन
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर : ३ विशेषांक
५) सिंधुताई सकपाळ
६) डॉ अनिल अवचट
७) लता मंगेशकर
८) मराठी भाषा
९) महात्मा फुले
१०) सुरेश भट
११) तंबाखू विरोधी दिन
१२) बालदिन
१३) संविधान दिन
१४) पर्यावरण
१५) गुरू पौर्णिमा

लेख मालांची झाली पुस्तके

न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेखमाला पुढील पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत.
१) समाजभूषण.
लेखक : देवेंद्र भुजबळ. भरारी प्रकाशन, मुंबई

२) मराठी साता समुद्रापार.
लेखिका : मेघना साने. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

३) जीवन प्रवास
लेखिका : सौ वर्षा महेंद्र भाबल. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
संत नामदेव उत्कृष्ट आत्मचरित्र पुरस्कार प्राप्त.

४) समाजभूषण २
लेखिका : सौ रश्मी हेडे. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
सर्वद साहित्य पुरस्कार प्राप्त.

५) मी, पोलीस अधिकारी
लेखिका : सुनीता नाशिककर. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई.
राज्यपाल श्री रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मध्ये प्रकाशन.

राज्यपालांच्या हस्ते २ पुस्तकं प्रकाशित.

६) माझी कॅनडा – अमेरिका सफर
लेखक : डॉ भास्कर धाटावकर. चैतन्य प्रकाशन, मुंबई.

७) “पौर्णिमानंद” काव्य संग्रह
कवयित्री: सौ पौर्णिमा शेंडे. मुंबई. न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई

८) मराठी इथे, मराठी तिथे – ई बुक
मेघना साने. उद्वेली प्रकाशन, ठाणे.

९) “आम्ही अधिकारी झालो”

लेखक : देवेंद्र भुजबळ. न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन. नवी मुंबई

न्युज स्टोरी टुडे पब्लिकेशन ची प्रकाशने

या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या पुढील लेख माला पुस्तक रुपात येऊ घातल्या आहेत.
१) बातमीदारी करताना : प्रा डॉ किरण ठाकूर. पुणे
२) मनातील कविता : डॉ गौरी जोशी कंसारा. अमेरिका
३) नर्मदा परिक्रमा : मानसी चेऊलकर. अलिबाग
४) महानुभाव पंथाचे मराठीत योगदान : प्रा डॉ विजया राऊत. नागपूर.
५) माध्यमातील माणसं : देवेंद्र भुजबळ.

स्नेहमिलन उपक्रम

न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेहमिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे. या स्नेहमिलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय अनौपचारिक आणि एखाद्या लेखक, कवी यांच्या घरीच असते. इथे कुणी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सूत्र संचालक असे काहीही नसते. निखळ एकमेकांची ओळख, अनुभव, विचारांची देवाणघेवाण, गप्पागोष्टी असे लोभसवाणे स्वरूप असते.

आतापर्यंत नाशिक, पुणे येथे प्रा डॉ किरण ठाकूर सर यांच्या घरी, विरार येथे बालरोग तज्ञ डॉ हेमंत जोशी यांच्या कडे, नवी मुंबई येथे श्री देवेंद्र भुजबळ, सातारा येथे लेखिका सौ रश्मी हेडे, न्यू जर्सी, अमेरिका येथे कॅन्सर संशोधक डॉ सुलोचना गवांदे, ठाणे येथे कलाकार दाम्पत्य श्री हेमंत व सौ मेघना साने, लातूर येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या घरी असे स्नेहमिलन आयोजित झाले आहे.

पुणे,ठाणे येथील स्नेह मिलन

सामाजिक पर्यटन

पर्यटन म्हणजे केवळ मौज मजा नाही, तर सामाजिक आशयाचे पर्यटन व्हावे, संबंधित संस्थांचे कार्य समक्ष पाहता यावे, त्यांच्या कार्यात सहभाग निर्माण व्हावा, त्यांच्या कार्याला हातभार लावावा अशा हेतूने न्युज स्टोरी टुडे च्या वतीने सामाजिक पर्यटन आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

असे पहिले सामाजिक पर्यटन नवी मुंबईतील आनंदवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

आनंदवन भेट

यावेळी श्री प्रकाश आमटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना ७५ हजार रुपये भेट देण्यात आले. असेच काही पर्यटन उपक्रम विचाराधीन आहेत.

असे हे अनोखे पोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9, मिड डे आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री भुजबळ हिने कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.

निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते, माजी पत्रकार देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची निर्मिती करीत असतात.

पुरस्कार

या पोर्टलला आतापर्यंत पुढील पुरस्कार मिळाले आहेत.

१) जनमत घेऊन अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असणारा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात पत्रकार दिनी, ६ जानेवारी २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पत्रकार दिनी उत्कृष्ट पोर्टल म्हणून पुरस्कार.

२) पोर्टलचे सांस्कृतिक योगदान लक्षात घेऊन “एकता पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

३) नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी “विशेष सन्मान” करण्यात आला.

४) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ. अलका भुजबळ यांना “सावित्रीबाई फुले पुरस्कार“, ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये ८ जानेवारी २०२३ रोजी प्रदान करण्यात आला.

५) पोर्टल चे सामाजिक योगदान म्हणून “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” २५ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

६) पोर्टलचे साहित्यिक योगदान लक्षात घेऊन “सर्वद पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

या पोर्टलला मिळालेले व मिळणारे यश म्हणजे सर्व लेखक, कवी, विविध कारणांनी पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे” असे म्हणणे योग्य ठरेल.
सर्वांचे स्नेह, सहकार्य पुढेही मिळत राहील, असा विश्वास वाटतो.

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४