Sunday, October 19, 2025
Homeयशकथान्यूज स्टोरी टुडे : एक दृष्टिक्षेप

न्यूज स्टोरी टुडे : एक दृष्टिक्षेप

न्यूज स्टोरी टुडे (www.newsstorytoday.com) हे आंतरराष्ट्रीय मराठी वेबपोर्टल सुरू होऊन आज ३ वर्षे पूर्ण झाली याचा मनस्वी आनंद होतो आहे.

या ३ वर्षात वेबपोर्टल ला मिळालेले मान सन्मान ही या पोर्टल च्या यशाची पावतीच समजली पाहिजे. काही प्रमुख सन्मान, पुरस्कार असे आहेत :

१) जनमत घेऊन अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असणारा राज्यस्तरीय “चौथास्तंभ पुरस्कार” मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शानदार सोहळ्यात पत्रकार दिनी, ६ जानेवारी २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र, नरिमन पॉईंट, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.

२) एकता पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांच्या हस्ते साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे प्रदान.

३) राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे पुरोगामी विचारांचे पोर्टल म्हणून पुरस्कार.

४) पोर्टल च्या निर्मात्या म्हणून सौ अलका भुजबळ यांना ठाणे येथे गडकरी रंगायतन मध्ये ८ जानेवारी २०२३ रोजी सावित्रीबाई फुले पुरस्कार.

५) माणुसकी सेवा गौरव पुरस्कार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी नाशिक येथे प्रदान करण्यात आला.

६) नवी मुंबईतील मराठी साहित्य, संस्कृती, कला मंडळातर्फे मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सन्मान करण्यात आला.

अशा या आपल्या वेबपोर्टल ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून ४ लाख ७६ हजाराहून अधिक याचे व्ह्युज आहेत.

मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, कला याचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी हे पोर्टल महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या वेबपोर्टलशी जोडल्या गेले आहेत आणि जोडले जात आहेत.

या वेबपोर्टल वर आता पर्यंत दररोज एक तसेच काही विशेष प्रसंगी अनेक, अशा ६०० कविता तर वाचक लिहितात.. या सदरातून (७६ सदरे) वाचकांची १००० पत्रे प्रसिध्द झाली आहेत.

लेखमाला

१) अमेरिका स्थित डॉ गौरी जोशी कंसारा – थोर कवी व त्यांच्या कवितांवर आधारित “मनातील कविता” : २४ भाग
२) प्रा डॉ किरण ठाकूर – “बातमीदारी करताना” : ३५ भाग
३) सौ वर्षा महेंद्र भाबल – “जीवन प्रवास” : २७ भाग
४) निवृत्त डी.वाय.एस.पी. सुनीता नाशिककर – “मी, पोलीस अधिकारी” : 18 भाग
५) वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुलांच्या जीवनावरील डॉ राणी खेडीकर – “लालबत्ती” : ४७ भाग.
६) प्रा विसुभाऊ बापट – “कुटूंब रंगलंय काव्यात” : ५३ भाग.
७) टिव्ही कलाकार गंधेकाका – गिरनार परिक्रमा : ७ भाग
८) डॉ भास्कर धाटावकर – “माझी कॅनडा अमेरिका सफर” : ११ भाग
९) लेखिका प्रतिभा चांदूरकर – कथा माला, स्वप्नरंग स्वप्नीच्या : २१ भाग
१०) श्री हेमंत सांबरे – “सावरकर समजून घेताना” : ५ भाग
११) प्रा डॉ विजया राऊत, नागपूर – “महानुभावांचे मराठी योगदान” : २५ भाग
१२) अमेरिका स्थित तनुजा प्रधान – भावलेली गाणी : १२ भाग
१३) तृप्ती काळे – “महामारी आणि विश्वाचा नवोदय” : १५ भाग
१४) श्री प्रवीण देशमुख – “वर्धा साहित्य संमेलन” : १२ भाग
१५)श्री विकास भावे – ओठावरली गाणी” : १०० भाग
१६) प्रिया मोडक – “राग सुरभी” : ३० भाग
१७) प्रतिभा चांदूरकर – “अमेरिका : माझ्या दृष्टीकोनातून ” : १० भाग
१८) मेघना साने – “माझी ऑस्ट्रेलिया सफर” : ६ भाग
प्रसिध्द झाल्या आहेत.

विद्यमान लेखमाला

१) कुमारी समृद्धी विभुते, ब्राझिल : ब्राझिल डायरी
२) प्रकाश चांदे : अवती भवती
३) प्रा डॉ शार्दुल वैद्य : आयुर्वेद उवाच
४) निवृत्त माहिती संचालक सुधाकर तोरणे : मी वाचलेले पुस्तक
५) श्री विलास कुडके : दुर्मीळ पुस्तके
६) डॉ राणी खेडिकर : रण रागिणी
७) नीला बर्वे, सिंगापूर : “पद्मश्री”

८) सुजाता दिवाकर : नर्मदा परिक्रमा

नियमित सदरं

१) पुस्तक परिचय
२) पर्यटन
३) हलकं फुलकं
४) चित्रसफर
५) आठवणीतील व्यक्ती
६) दिन विशेष
७) यश कथा
८) संस्था परिचय
९) “माहिती”तील आठवणी

प्रकाशित विशेषांक

१) डॉक्टर म्हणजे देव
२) आषाढी एकादशी
३) स्वातंत्र्य दिन
४) डॉ बाबासाहेब आंबेडकर : ३
४) सिंधुताई सकपाळ
५) डॉ अनिल अवचट
६) लता मंगेशकर
७) मराठी भाषा
८) महात्मा फुले
९) सुरेश भट
१०) तंबाखू विरोधी दिन
११) बालदिन
१२) संविधान दिन
१३) पर्यावरण
१४) गुरू पौर्णिमा

प्रकाशने

न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर प्रकाशित झालेल्या लेख माला पुढील पुस्तकात रूपांतरित झाल्या आहेत.
१) समाजभूषण.
लेखक : देवेंद्र भुजबळ.
भरारी प्रकाशन, मुंबई

२) मराठी साता समुद्रापार.
लेखिका : मेघना साने.
ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

३) जीवन प्रवास
लेखिका : सौ वर्षा महेंद्र भाबल
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई

४) मी, पोलीस अधिकारी
लेखिका : सुनीता नाशिककर
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई

५) समाजभूषण २
लेखिका : रश्मी हेडे. सातारा
न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स, नवी मुंबई

६) माझी कॅनडा अमेरिका सफर
लेखक : डॉ भास्कर धाटावकर
चैतन्य प्रकाशन, मुंबई.

स्नेहमिलन

न्यूज स्टोरी टुडे पोर्टल चे लेखक, कवी, अन्य सर्व संबधित यांचे अनौपचारिक स्नेह मिलन हा एक आगळा वेगळा उपक्रम आहे.
आता पर्यंत संगमनेर, नाशिक, पुणे, विरार, नवी मुंबई, सातारा, न्यू जर्सी (अमेरिका) येथे स्नेह मिलन आयोजित झाले आहे.

आज वर अनेक मान्यवर व्यक्तींनी पोर्टल विषयी गौरवपर लेखन केले आहे. असे हे अनोखे वेबपोर्टल आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9 आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री भुजबळ हिने कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून २२ जुलै २०२० पासून सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले. आणि बघता बघता आता ते आपल्या सर्वांचे झाले. पुढे देवश्री अमेरिकेत उच्च शिक्षण घ्यायला गेली आणि निर्माती म्हणुन अलका ने पोर्टल यशस्वीपणे पुढे नेले. त्याच बरोबर प्रकाशन व्यवसायात सुद्धा पदार्पण केले.
या पोर्टलला मिळालेले व मिळणारे हे यश म्हणजे सर्व लेखक, कवी, वाचक, विविध कारणांनी पोर्टलशी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीकच आहे.
आपले प्रेम, सहकार्य असेच राहू द्या.
नवनवीन कल्पना, विचार पुढे नेऊ या. नवे जग घडविण्यासाठी प्रयत्नशील राहू या.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप