Wednesday, June 18, 2025
Homeयशकथान्यूज स्टोरी टुडे : गरुड झेप

न्यूज स्टोरी टुडे : गरुड झेप

“सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांतीमय बोनस जीवन” अशी अनेकांनी समजून घेतलेल्या निष्क्रिय जीवनाला सक्रीय करून दाखवणारे, साहित्यिक व समाजसेवी दांपत्य म्हणजे, न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक निवृत्त माहिती संचालक श्री. देवेंद्र भुजबळ सर व निर्मात्या सौ. अलका भुजबळ होय.

“सेवानिवृत्ती म्हणजे नवीन आयुष्याची नवी सुरुवात !”
असा पायंडा या उभयतांनी जगासमोर उभा केला. कोरोना काळात सारे जग थांबले, पण या कुटुंबाने, आपल्या मुलीच्या (देवश्री) हातून ‘न्यूज स्टोरी टुडे’ या वेबपोर्टलचे बीज पेरले. आज या बीजातून वटवृक्ष अवतरला. त्याची प्रत्येक पारंबी नवोदित लेखकांच्या व कवींच्या लेखांनी व काव्यांनी सजवली. अश्या वैचारिक लेखणीतून जणू वटवृक्ष लाल फळांनी बहरून गेला. त्यांचा मनसोक्त आस्वाद, जगभरातील असंख्य वाचकरसिक घेत आहेत. हीच या पोर्टलची विशेष महती होय.

स्वतः साठी सगळेच जगतात. पण वेळेचे भान न बाळगता, पोर्टलवरील लेखांचे एडिटिंग करणे, प्रत्येक मथळ्याखाली, फोटो शोधून त्याची सांगड घालणे, अलंकारिक विरामचिन्हे देणे, हरएक लेखकाला उत्स्फूर्तपणे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास बळ देणे, सदा मदतीचा हात देणे, साहित्यिकांचे घरोघरी स्नेहसंमेलन घडवून आणणे, उपस्थितांचे प्रेमाने आदरातिथ्य करणे, न कंटाळता विचारांच्या देवाण-घेवाणीत समरस होऊन जाणे नि तेही विनयशील नम्र भावनेने, हेच त्यांचे अलंकार आहेत.

व्यस्त दिनचर्येत वावरत असून, आज न्यूज स्टोरी टुडे पोर्टलने, प्रकाशन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याविषयी मला आज बोलावंसं वाटतं.
“पुस्तक प्रकाशन म्हणजे लेखनाला पुस्तकी रूपात जन्म देणे !”
सन २०२३ मध्ये न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या, सौ.अलका भुजबळ मॅडमने “जीवन प्रवास” पुस्तकाचे प्रकाशन करून, जणू गरुड झेप घेतली आहे.

पुस्तकाचे रूप सजवताना, त्यासाठी लागणारी मेहनत मी अगदी जवळून अनुभवली आहे. पुस्तकात छापला जाणारा अक्षराचा लहान मोठेपणा पडताळून निवड करणे, व्याकरण तपासणी, अलंकारिक विरामचिन्हे तपासून घेणे, वाक्यरचना, पुस्तकासाठी वापरल्या जाणाऱ्या पेपरची योग्य निवड करणे, पुस्तकाचे मुखपृष्ठ व अंतिम पृष्ठ, नीटस छायाचित्रात सजवणे , पुस्तकाला सुबकता येण्यासाठी मुद्रणालयात तासन् तास थांबून, ते काम तडीस नेणे, कच्च्या प्रिंट्स दोन तीन वेळा वाचून तपासणे, ISBN साठी अर्ज करून, पाठपुरावा करणे, पुस्तकात फोटोंची योग्य निवड करून, त्यांची योग्य पानांवर रेखाटन करणे फोटोंची सुबकता पडताळणे, अशी बरीच मेहनत असते.
जसे की लहान बाळाचा जन्मच !

अनंत परीक्षांना पार करत पुस्तक रूपात येते. प्रकाशिका सौ. अलका भुजबळ व संपादक श्री. देवेंद्र भुजबळ सर यांच्या कामातील सातत्य, कौशल्य व चिकित्सात्मक शैली आणि दोघांच्या मार्गदर्शक वृत्तीतून, “जीवन प्रवास” पुस्तकी रूपात प्रकाशित झाले आहे.

न्यूज स्टोरी टुडेने प्रकाशनाकडे घेतलेली ही गरुड झेप, पत्रकारिकेतील उत्कृष्ठ कार्य आहे.

आता न्यूज स्टोरी टुडेला सर्वांत उत्कृष्ठ पोर्टल म्हणून, चौथा स्तंभ पारितोषिक मिळाले आहे, ही या सेवाभावी दांपत्याच्या प्रामाणिकपणाची व मेहनतीची अढळ पोचपावती आहे.

साहित्यिक व सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या भुजबळ कुटुंबाचे खूप खूप अभिनंदन !
त्यांच्या पुढील कार्याच्या घोडदौडीला मनःपूर्वक शुभेच्छा !

“न्यूज स्टोरी टुडे” वेबपोर्टल तुला, माझा मानाचा मुजरा !

वर्षा भाबल.

– लेखन : सौ.वर्षा महेंद्र भाबल. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on राजमाता माँ जिजाऊ
उज्ज्वला केळकर on पाऊस : काही कविता…
उज्ज्वला केळकर on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on हे जीवन…
सौ. सुनीता फडणीस on कथा
सौ. सुनीता फडणीस on विमान “अपघात” की “घातपात” ?
सौ. सुनीता फडणीस on हे असं कां होतं ?