न्यूज स्टोरी टुडे अर्थात www.newsstorytoday.com हे पोर्टल सध्या ८६ देशात पोहोचले असून ४ लाख ७७००० हून अधिक ह्यूज मिळाले आहेत. या पोर्टल ला पत्रकारितेतील अत्यंत सन्मानाचा असा राज्य स्तरीय “चौथा स्तंभ” पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ६ जानेवारी, पत्रकार दिनी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात मा.मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या पोर्टल वर कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, संशोधन, शिक्षण, समाज कल्याण, यश कथा अशा स्वरूपाचा मजकूर प्रसिद्ध होत असतो.
या पोर्टलवर मनातील कविता (डॉ गौरी जोशी कंसारा, अमेरिका) बातमीदारी करताना (प्रा डॉ किरण ठाकूर, पुणे) जीवन प्रवास (सौ वर्षा महेंद्र भाबल, नवी मुंबई) आणि मी पोलिस अधिकारी झाले (निवृत्त पोलिस उपअधीक्षक सुनीता कुळकर्णी नाशिककर, मुंबई ), चला केरळ ला (सौ मनीषा पाटील, पालकाड, केरळ), कुटूंब रंगलंय काव्यात (प्रा विसुभाऊ बापट) महानुभावांचे योगदान (प्रा डॉ विजया राऊत, नागपूर)
अशी सदरे यशस्वीरित्या पूर्ण झाली असून ती वाचकप्रिय ठरली आहेत. तर ओठावरील गाणे (विकास भावे, ठाणे) चित्रसफर, पुस्तक परिचय, पर्यटन, यश कथा, “माहिती”तील आठवणी, राग सुरुभी, वाचक लिहितात…ही सदरे सुरू आहेत.
आता पूर्ण झालेल्या सदरांच्या जागी नवीन वर्षापासून नवीन सदरे सुरू करावयाची आहेत. त्यासाठी आपल्या कडून विषय, कल्पना, सूचना हव्या आहेत.
तरी इच्छुक व्यक्तींनी आपल्या सदरांचे विषय, महत्व, वेगळेपण, स्वतःचा थोडक्यात परिचय, छायाचित्र आदी माहिती +919869484800 या मोबाईल क्रमांकावर वर्ड फाईल मध्ये २७ डिसेंबर २०२२ पर्यंत पाठविल्यास नक्कीच विचार करता येईल.
हे पोर्टल अराजकीय, अव्यावसायिक स्वरूपाचे असून कुठल्याही प्रकारच्या जाहिराती, ॲडव्हरटोरियल मजकूर (पैसे घेऊन लेखन प्रसिध्द केलेला, नियमित लेखन भासावा असा मजकूर) प्रसिध्द करण्यात येत नाही.
त्यामुळे लेखक, कवी, अन्य व्यक्ती यांना कुठल्याही प्रकारचे मानधन देण्यात येत नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
तर चला मंडळी, नवीन सदरे, कल्पना, सूचना यांच्या द्वारे नवीन विश्व नाती जोडू या.
आपला
– देवेंद्र भुजबळ
संपादक
न्यूज स्टोरी टुडे
www.newsstorytoday.com
☎️ 9869484800