Home लेख न्यूज स्टोरी टुडे : “वसुधैव कुटुंबकम्”

न्यूज स्टोरी टुडे : “वसुधैव कुटुंबकम्”

1

“न्यूज स्टोरी टुडे” ने तीन वर्षे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. विविध लेखकांचे विविध विषयावरील साहित्य आम्हांला या पोर्टलमुळे घरबसल्या विनामूल्य मिळतं. केवढं मोठं कार्य आहे हे. रोजच्या रोज ठराविक वेळी हे प्रकाशित करणे, अखंडपणे तीन वर्ष चाललं आहे, चालतच राहणार आहे त्यामागे देवेंद्र सर आणि अलका मॅडम यांचे अफाट योगदान आहे.

नेहमीची कामे, कार्ये, दूरचे प्रवास या कशाचाही पोर्टल प्रकाशनासाठी अडथळा होत नाही. पोर्टल प्रकाशित करूनच ते बाहेर जायला निघतात अथवा एकजण हे काम सांभाळून दुसरा दुसरी कामे करण्यास बाहेर पडतो. एखाद्या यज्ञाप्रमाणे हे कार्य चालू आहे.

बहुतेक घरी आई वडील जो व्यवसाय करतात तोच पुढे मुले सुरू ठेवतात. इथे मात्र वेगळंच. देवश्रीने हे वेबपोर्टल सुरू केले मात्र शिक्षणासाठी ती परदेशात गेली. त्यामुळे पोर्टलचा प्रवास खंडित होऊ नये म्हणून देवेंद्र सर आणि अलका मॅडम यांनी आपली कामे बाजूला करून न्यूज स्टोरी टुडे प्रकाशित करण्यास सुरुवात केली. यासाठी लागणारे संगणकाचे ज्ञान दोघांनी आत्मसात केले.

पोर्टल प्रकाशनाची अगदी जुजबी माहिती असतांना या दोघांनी ते एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि काही दिवसांतच पोर्टल वाचकांची संख्या पाच लाखावर गेली. वेळेला स्वतःची आजारपणे बाजूला ठेवून हे दांपत्य व्रत घेतल्यासारखे हे कार्य करीत आहे. विविध ठिकाणी समाजसेवा सुरू आहेच. शिवाय स्वतःचे लिखाण!अनेक ठिकाणी अध्यक्ष, सन्माननीय अतिथी म्हणून सातत्याने आमंत्रित. तिथे जाणे, भाषणे करणे, लोकांना मार्गदर्शन करणे या गोष्टी सुरू आहेतच.

बक्षीसे तर खूप मिळविली. विविध क्षेत्रातील अनेक माणसे जोडली.आता देवश्री, मास्टर्स इन जर्नालिझम ही पदवी उच्चतम गुणांनी संपादित करून परत आली आहे आणि लगेच पोर्टलच्या कामालाही लागली आहे. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत सुशिक्षित असलेले हे कुटुंब आता अधिक ऊर्जेने काम करील. सर्वांना आपलेसे करणाऱ्या या कुटुंबाचा एक भाग मी कधी झाले कळलेच नाही. खऱ्या अर्थाने “वसुधैव कुटुंबकम्” हे प्रत्यक्षात आणतात. तिघांनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा !

नीला बर्वे

— लेखन : नीला बर्वे. सिंगापूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

1 COMMENT

  1. खूप छान. Newsstorytoday ला तिसर्‍या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन 💐👏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version