न्यूज स्टोरी टूडे वेबपोर्टल ला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजेच आज या पोर्टलचा वाढदिवसच! आता हे पोर्टल रूपी बाळ तीन वर्षांचे झाले असून त्याची वाढ मात्र चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन झपाट्याने विस्मित करणारी अशीच झाली आहे आणि त्याची दिगंत किर्ती सातासमुद्रापार करून ती एकूण 80हून जास्त मराठी वाचक देशात पोचली आहे. ही मायबोली मराठीला अभिमानास्पद बाब आहे.
या पोर्टलचे अभ्यासू संपादक, सव्यासी लेखक व महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक
श्रो देवेंद्र भुजबळसाहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी आणि सिद्धहस्त लेखिका सौ.अलका भुजबळ या उभयतांनी आपल्या समर्थ लेखनीद्वारे अनेक महत्त्वपूर्ण समाज प्रबोधनात्मक, वैचारिक केलेले सकस लिखाण हे या पोर्टलचे वैशिष्ट्य होय. त्याचबरोबर इतर लेखक, लेखिकांना त्यांनी प्रोत्साहन देऊन विविध विषयांवरील लेख संपादित करून वाचकांसमोर सादर केले. भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली.
श्री भुजबळसाहेबांनी मी लिहीलेल्या “श्रावण मास” या लेखाला गतवर्षी प्रसिद्धी दिली. त्यावरील वाचकांचे अभिप्रायही छापले आणि नकळत मी या पोर्टलशी जोडलो गेलो.
पुढे कॅनडा आणि अमेरिका या देशाना भेटी दिल्यानंतर लिहीलेल्या लेखमालेस प्रसिद्धी देऊन माझे “सफर कॅनडा आणि अमेरिकेची” हे पुस्तक या पोर्टलच्या माध्यमातून 86 देशातील मराठी वाचकांपर्यंत पोचविले. त्याशिवाय आपल्या देशात, महाराष्ट्रात ही लेखमाला या माध्यमातून सादर केली. त्यांस मिळालेल्या प्रतिसादामुळेच मी या लेखमालेचे पुस्तकात रूपांतर करून प्रसिद्ध केले.श्री भुजबळसाहेब यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी लिहीत राहिलो त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख मी या ठिकाणी करीत आहे.
आज विविध विषयांवर या पोर्टलच्या माध्यमातून आपल्या देशातीलच नव्हे, तर परदेशात स्थायिक झालेले मराठी भाषिक लेखक, लेखिका आपल्या मायबोली मराठीशी नाळ जोडून आहेत. लक्ष्यावधी वाचक या वाचनीय वैचारिक, विविध प्रबोधनात्मक, काव्य, हलके फुलके प्रहसनपर लेखमालेचा आस्वाद, आनंद घेत आहेत. या माध्यमातून विचाराचे आदानप्रदान करीत आहेत. ही किमया सौ व श्री भुजबळसाहेबांनी या वेबपोर्टल द्वारे साध्य केली आहे.
मी या पोर्टलचा नियमित वाचक म्हणून आनंद घेत आहे.
शेवटी न्यूज टूडे स्टोरी पोर्टलचे मनःपूर्वक अभिनंदन करून भविष्यात त्याची व्याप्ती अशीच जगभरातील मराठी वाचकांपर्यंत पोहोचो अशा शुभेच्छा व्यक्त करून श्री देवेंद्र भुजबळसाहेब व सौ.अलका भुजबळ यांनाही या उपक्रमाबद्दल धन्यवाद देतो.
- — लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800