‘न संपणारी रेघ‘ कादंबरी वाचून मी फारच प्रभावित झालो. या कादंबरीत चार पिढ्यांचे प्रातिनिधिक चित्रण फारच छान जमलेलं आहे.
आजेसासूपासून नातीपर्यंतच्या एका लहान गावातील बिरादरीच्या घरातील सर्व पात्रांच्या मनोभूमिकांचे यथार्थ दर्शन घडविण्यास लेखिका यशस्वी झाल्या आहेत. बिरादरीतील कुटुंबातील प्रत्येक स्त्री, पुरुषातील भावनिकतेचे मनोज्ञ चित्रण या कादंबरीत फार उत्तम प्रकारे केले आहे.
अमेरिका ते भारतातील या चार पिढ्यांतील भूमिकेचा संगम फार कुशलतेने व उत्कटतेने घडविला आहे.
सोशिकता, ओढाताण, जोडणं, तोडणं, समज, अट्टाहास, व्यवहारीपणा आणि भावनिकता या कादंबरीतून अप्रतिमरीत्या रेखाटली आहे.
घरातलं पिचत रहाणं, प्रतारणेला माफी की शिक्षा, विवाह संस्थेच्या मान्यतेपासून तर लिव्ह इन रिलेशनपर्यंतच्या उदभवणाऱ्या सर्व समस्या या स्त्रियांच्या बाबतीत केंद्रीभूत झाल्याचा विचार कादंबरीतून दिसून आला व त्यास अंतिमरीत्या उचित न्याय लेखिकेने दिला आहे.
रेणू, खुशी, जेनी,आई, काकू, रणबीर, साँवरी, अशोक, जनार्दन आणि आजी ही पात्रे तर कादंबरीत अतिशय सजीव दिसण्यात लेखन कौशल्य सातत्याने प्रतीत होतांना दिसते.
एक सांगू या कादंबरीवर अतिशय उत्तम चित्रपट निर्माण होऊ शकेल.त्या दृष्टीने जरूर प्रयत्न व्हावा ही अपेक्षा आहे.
लेखिकेने सुंदर कादंबरी लिहिल्याबद्दल मनापासून अभिनंदन करतो व भविष्यात देखील अशी सुरेख कादंबरी लिहिण्यासाठी हार्दिक शुभेच्छा प्रदर्शित करतो.
– लेखन : सुधाकर तोरणे,
(निवृत्त माहिती संचालक.)
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
छान कादंबरी परिचय..