देशातील पाणी समस्या दुर करण्यासाठी योगदान तसेच जल संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महनीय व्यक्तीना केंद्रीय जल संरक्षण मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, जलपुरुष राजेंद्र सिंह यांच्या हस्ते “जलप्रहरी” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या ३० मार्च रोजी नवी दिल्ली येथे हा शानदार समारंभ जलशक्ती मंत्रालयाच्या संयोगाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय साठे यांनी दिली आहे.
नवनवीन उपक्रम राबुन तसेच जलक्षेत्रात मार्गदर्शन करून आदर्श निर्माण करणारे देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, अधिकारी यांना जलप्रहरी देऊन गौरवण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून राहुरीचे पत्रकार शिवाजी घाडगे, मुंबई चे आयआरएस अधिकारी उज्वल चव्हाण, नांदेडचे दिपक मोरताळे, अंबेजोगाईचे अनिकेत लोहिया आदींना हा पुरस्कार मिळणार आहे.
महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, पंजाब, राजस्थान, आंध्रप्रदेश, तेलंगणा, अरुणाचलप्रदेश, आसाम,
तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, दिल्ली या राज्यातील जल संरक्षण क्षेत्रात चांगले काम करण्याऱ्या संस्था व व्यक्ती यांचा सामावेश आहे.
पुढील व्यक्तींनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे :-
नवी दिल्लीचे पर्यावरण रक्षक दिवान सिंह व सुलभ इंटरनॅशनल चे बिद्रेश्वर पाठक, हरियाणा: सोनीपत अभिमन्यू दाहिया, गुजरात: भावनगरचे रमेश भाई पटेल, आंध्रप्रदेश: विशाखापट्टणम बोलाशेट्टी सत्यनारायण, वारुणचे विजय देशमुख, बिहार :छपारा मानव मनोहर,मोतिहारी डी एम श्रीशत कपिल अशोक (आईएएस) अरुणाचल : इटानगर इगम बसार, आसाम: कोनझार डी सी बर्नान डेका (आईएएस ) पंजाब: बरनाला रबदिप परवाही, उत्तर प्रदेश :ग्रेटर नोयाडाचे गौतम बुध्द, रामबीर तंवर,वाराणसी सजल श्रीवास्तव, सुलतानपुर संदीप अहिरवार, जम्मू काश्मिर :देवधर चे समिर अंसारी, हजारीबाग संजय कुमार सिंह, मध्यप्रदेश: छिदवाडा नीरज कुमार सिंह, ग्वाल्हेर पंकज तिवारी, इंदोर प्रियांशु कुमठ, छत्तीसगड: विरेद्र सिंह,तेलंगणा: नारायनपेड जिल्हाधिकारी हरिचन्दन दासरी,राजस्थान: बासवाडा जयेश जोशी, रजनीश शर्मा, कोटपुतळी विष्णू मित्तल, ब्रम्हाकुमारी माउंट आबु यशवंत पाटील, उत्तराखंड :प्रकाश सिंह बिष्ट, त्रिपुरा :अगर तळा विभूतिदेव वर्मा, आदी महनीय व्यक्ती याना जल प्रहरीने सन्मानित करण्यात येणार आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
देवेंद्र सर नमस्कार 🙏 मेघना साने यांनी प्रभाते मनी या चॅनल साठी घेतलेली तुमची मुलाखत पाहिली. मेघना मॅडमनी नेमके प्रश्न विचारून तुम्हाला बोलतं केलं आणि तरूण पिढीला मार्गदर्शक ठरतील अशी माहिती तुमच्या उत्तरांमधून आमच्यापर्यंत पोचवली याबद्दल मेघना मॅडम आणि तुम्हालाही धन्यवाद 🙏