पत्रकार दिन साजरा
आपले स्मृतीप्रित्यर्थ
बाळकृष्ण जांभेकर
व्यक्ती न पावन तीर्थ
मुद्रीत रूपा ज्ञानेश्वरी
सादर जन उत्तानार्थ
पत्रकारिता मोलसांगे
सीमापार ठेवा स्वार्थ
दर्पण पहिले वृत्तपत्र
मराठी देणगी यथार्थ
दिग्दर्शनआद्यमासिक
जन सामान्या कृतार्थ
पत्रकार नवा जन्मला
तूचघडवला काक्कर्थ
लेखणी हाती देखणी
समाजप्रबोधनप्रित्यर्थ
पत्रक ना साधन फक्त
व्यवसाय धनप्राप्त्यर्थ
न मुद्रणकला उपयोग
केवळ चालो चरितार्थ
मार्गत्यांनी दिला सार्थ
कळावा पूर्ण मतितार्थ
निर्भय कठोर सत्यव्रत
जाणे त्यास फलितार्थ
अल्पायुषीअसूनसुध्दा
पाहिलाजीवनी गतार्थ
होई चिरायु किर्तीमान
साधला स्वस्थ परमार्थ

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800
