प्रभात ट्रस्ट ह्या सन २०११ पासून नवी मुंबईमध्ये कार्यरत असणाऱ्या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून गत दहा वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येते.
आयुष्याचे गुरुकुल श्रृंखलेमध्ये यावर्षी अकरावे पुष्प गुंफण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेणारी मुलाखत श्री.महेंद्र कोंडे जनसंपर्क अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका हे घेणार आहेत.
त्याचबरोबर प्रभात ट्रस्ट अवयवादान प्रचार प्रसारासाठी कार्यरत आहे. यासाठी स्मृतीव्याख्यान कार्यक्रमामध्ये मृत्यूपश्चात अवयवदान केलेल्या कै.अरविंद मणीलाल गाला व कै. आशा मुरलीधर ओक यांच्या परिवारास अवयवदाता सन्मान तसेच अवयदान क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी नवी मुंबईतील मेडिकव्हर हाॅस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण व हिपॅटो पॅनक्रॅटिक बिलियरी (HPB) सर्जरी विभागाचे संचालक डॉ. विक्रम राऊत यांना स्टार ऑफ द इयर सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
तसेच संस्थेच्या कै. प्रा. बी.आर. थोरात स्मृतीग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मा.डॉ. नंदकिशोर मोतेवार संचालक- ज्ञान स्त्रोत केंद्र, मुंबई विद्यापीठ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याप्रसंगी पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी संकल्प तुला दानाचा सामाजिक परिवर्तनाचा या उपक्रमांतर्गत सुवर्ण महोत्सवी तुला संपन्न होणार आहे.
नवी मुंबईमध्ये एकमेव असणाऱ्या या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा यज्ञ अखंड सुरू आहे. उपरोक्त कार्यक्रम उद्या, गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी सायं. 5 वा अण्णासाहेब पाटील सभागृह सेक्टर 5 कोपरखैरणे, नवी मुंबई येथे होणार आहे. सदर प्रसंगी सामाजिक राजकीय तसेच विविध स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : 8169656386 / 9224776522 / 9869432224 पुरस्काराबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कै.अरविंद मणीलाल गाला यांच्या साठी: हर्ष गाला 99672 58517 कै. आशा मुरलीधर ओक यांच्या साठी :डॉ मीनल 9137425005 डॉ. विक्रम राऊत: 97176 57178 डॉ.नंदकिशोर मोतेवार : 94211 36899
— लेखन : डॉ. प्रशांत भा.थोरात. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800