वसंताची चाहूल देते
मधुर कोकीळ कुजन
कैऱ्या दाखवत वेधतो
आम्रतरु मन भावन
कैऱ्या हिरव्या ताज्या
आणा झाडाच्या तोडून
धुवून लगेचच घ्या मग
छानपैकी त्या वाफवून
साल सोलावी अलवार
जराशी थंड झाल्यावर
घ्यायचा काढून फक्त
मऊ कैरीचा आंबट गर
गूळ घालावा आवडीने
नि वेलची पूड सुगंधीत
सैंधव मीठही हवे यात
वाढवण्यास रस चवीत
एकत्र पदार्थ मिसळून
पातळसर करा मिश्रण
पिण्यास घेण्याआधी हे
शीतकपाटात ठेवा पण
पाचक चविष्ट थंड गार
देशी पेय आपले हंगामी
आंबटगोड पन्हे ग्रीष्मात
उष्माघात टाळण्या नामी

– रचना : सौ. मनिषा पाटील. केरळ.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800