Home साहित्य परतीचा पाऊस…

परतीचा पाऊस…

0

परत फिरेल कधी हा
परतीचा पाऊस
नको आता रडगाणे
पुन्हापुन्हा गाऊस

जेमतेम आले होते
थोडेथोडे पीक
लावशील का आता तू
मागायला भीक

वाहून गेली सारी
माझी सोन्याची रास
लेकरांच्या तोंडी सांग
देवू कुठला घास

कडबा झाला ओला
उरला नाही चारा
सर्जा राजा उद्या माझे
खातील का रे वारा

तू काही ठेवत नाही
सरकार काही नाही देत
एकदा असे कर आता
वाहून ने माझे सारे शेत

थांब तुलाच काहीतरी
नक्की घडवावे लागेल
सरकारला अन् तुला
सोबत सोबत रडवावे लागेल

यशवंत पगारे

– रचना : यशवंत पगारे. बदलापूर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version